आलिया भट यंदा वाढदिवस करणार नाही साजरा, कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 06:16 PM2021-03-12T18:16:44+5:302021-03-12T18:17:08+5:30

आलिया भटचा १५ मार्च रोजी वाढदिवस आहे. मात्र यंदा ती वाढदिवस साजरा करणार नसल्याचे समजते आहे.

Alia Bhatt will not celebrate her birthday this year, because she came forward | आलिया भट यंदा वाढदिवस करणार नाही साजरा, कारण आले समोर

आलिया भट यंदा वाढदिवस करणार नाही साजरा, कारण आले समोर

googlenewsNext

अभिनेता रणबीर कपूरला नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे आणि सध्या तो होम क्वारंटाइन आहे. अशात त्याची गर्लफ्रेंड आलिया भट त्याला खूप मिस करते आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एक मुलगा आणि मुलीने हातात हात पकडलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करत आलियाने खूप मिस करत असल्याचे म्हटले आहे. या फोटोत कोणाचाच चेहरा दिसत नाही. पण लोकांचे म्हणणे आहे की आलिया आणि रणबीर कपूरचा हा फोटो आहे. दरम्यान आता असे समजते आहे की, यंदा आलिया तिचा वाढदिवस साजरा करणार नाही.

जेव्हापासून रणबीर कपूर आणि आलिया भट रिलेशनशीपमध्ये आले आहेत, तेव्हापासून आलिया दरवर्षी त्याच्यासोबतच वाढदिवस साजरा करते. या वेळी रणबीरची तब्येत ठीक नसल्यामुळे असे वृत्त येते आहे की, आलियाने १५ मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा करू नये, किंवा आपल्या सोबत केवळ कुटुंबच असावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.


आलिया रणबीरपासून दूर असली तरीही ती त्याची काळजी घेत आहे. अलीकडेच आलियाने रणबीरच्या कोरोना रिपोर्टनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होते, ज्यात असे लिहिले होते की, 'आपण ज्या गोष्टीतून जात आहोत, त्यातून आपण आणखी मजबूत होत आहोत'.


रणबीर कपूर आणि आलिया भट गेल्या २ वर्षापासून एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळत असते. त्यांनी लवकरात लवकर लग्न करावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.


रणबीर कपूर आणि आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ते लवकरच ब्रह्मास्त्रमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटातून त्यांच्या चाहत्यांना पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर त्यांची केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाची घोषणा २०१८ साली करण्यात आली होती. यात आलिया व रणबीर शिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन आणि डिंपल कपाडिया सारखे कलाकार दिसणार आहेत.


सध्या आलिया भट आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यातील आलिया भटच्या कामाची प्रशंसा होत आहे.

Web Title: Alia Bhatt will not celebrate her birthday this year, because she came forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.