आलियाने रणबीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, "तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 12:04 PM2023-09-28T12:04:17+5:302023-09-28T12:06:08+5:30

रणबीरसोबतचे काही unseen फोटोही तिने शेअर केलेत.

alia bhatt wishes ranbir kapoor on his 41 st birthday shares unseen photos of both | आलियाने रणबीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, "तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन..."

आलियाने रणबीरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, "तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन..."

googlenewsNext

बॉलिवूड स्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आज ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्या दिवशी त्याने चाहत्यांना 'अॅनिमल' सिनेमाचं टीझरही गिफ्ट दिलं आहे. तर रणबीर कपूरची better half अभिनेत्री आलिया भटनेसोशल मीडियावरुन पतीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. रणबीरसोबतचे काही unseen फोटोही तिने शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.

आलिया नेहमीच रणबीर कपूरची चाहती राहिली आहे. तो तिचा क्रश असल्याचं तिने अनेकदा कबूल केलं. काही वर्षांनी तिने रणबीरशीच लग्न केलं. अगदी फेअरीटेल वाटावी अशी त्यांची लव्हस्टोरी आहे. गेल्याच वर्षी आलियाने लेक राहालाही जन्म दिला. आज रणबीर कपूरसाठी खास दिवस आहे. तो ४१ वा वाढदिवस साजरा करत असून अॅनिमल सिनेमाचा टीझरही रिलीज झालाय. टीझर चाहत्यांना प्रचंड आवडलाय. आलियाने खास फोटो शेअर करत लिहिले,"माझं प्रेम...माझा सर्वात चांगला मित्र..माझी सर्वात आनंदी जागा...तू तुझ्या सिक्रेट अकाऊंटवरुन माझ्याच बाजूला बसून माझी ही पोस्ट वाचतोय. मला हेच सांगायचं आहे की 'हॅपी बर्थडे बेबी'...तू सगळं जादूई करतोस.'

आलियाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी रणबीर कपूरला शुभेच्छा दिल्या आहेत. तर चाहत्यांनी रणबीरचं सिक्रेट अकाऊंट नक्की कोणतं आहे ते सांग असाच हट्ट धरलाय. रणबीर सोशल मीडियावर नसला तरी त्याने अपडेट राहण्यासाठी सिक्रेट अकाऊंट उघडलं आहे हे त्याने अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं. मात्र त्याच्या जवळच्या मित्रपरिवारालाच त्या अकाऊंटबाबत कल्पना आहे.

रणबीरचा 'अॅनिमल' सिनेमा १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होतोय. यामध्ये त्याची आणि रश्मिका मंदानाची जोडी जमली आहे. तसंच सिनेमात अनिल कपूर, बॉबी देओल यांच्याही भूमिका आहेत. संदीप रेड्डी वांगा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

Web Title: alia bhatt wishes ranbir kapoor on his 41 st birthday shares unseen photos of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.