राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आलिया भटने नेसली लग्नातली साडी, 'गंगूबाई' साठी मिळाला पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 16:09 IST2023-10-17T16:07:32+5:302023-10-17T16:09:43+5:30
आलिया भटला 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आलिया भटने नेसली लग्नातली साडी, 'गंगूबाई' साठी मिळाला पुरस्कार
आज १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. गेल्या महिन्यात विजेत्यांची घोषणा करण्यात आली होती. आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बॉलिवूड, साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री मधून अनेक दिग्गज सहभागी झाले. सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट (Alia Bhat) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेत्री आलिया भटच्या आऊटफिटने सर्वांचंच लक्ष वेधलं.
आलिया भटला 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासाठी ती विज्ञान भवन येथे पोहोचली असता सर्वांचं लक्ष तिच्या आऊटफिटकडे गेलं. आलिया नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होती. विशेष म्हणजे तिने या खास दिवशी कोणत्याही नव्या आऊटफिटची निवड न करता चक्क लग्नातलीच साडी नेसली. आलियासाठी तिच्या लग्नाहून खास दिवस तो काय असेल. आणि आता राष्ट्रीय पुरस्कार मिळणार हाही तितकाच खास दिवस असल्याने तिने वेडिंग आऊटफिट घातले. यामुळे सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे गेलं.
आलियाने याआधीही अनेकदा तिचे कपडे रिपीट केले आहेत. आजही तिच्या लुकची चर्चा होती. तसंच या खास दिवशी तिच्यासोबत पती रणबीर कपूरही उपस्थित होता. पत्नीची साथ द्यायला त्याने आवर्जुन उपस्थिती लावली. संजय लीला भन्साळींची मात्र इथे आठवण येत असल्याचं आलियाने सांगितलं.