आलिया-रणबीरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाला एक वर्ष पूर्ण, आलियाने शेअर केला BTS व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 16:15 IST2023-09-10T16:13:32+5:302023-09-10T16:15:04+5:30
अभिनेत्री आलिया भट्टने एक BTS व्हिडीओ शेअर केला आहे. यात व्हिडीओमध्ये आलिया दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि रणबीर कपूरसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.

Alia Bhat
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने अभिनेत्री आलिया भट्टने एक BTS व्हिडीओ शेअर केला आहे. यात व्हिडीओमध्ये आलिया दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि रणबीर कपूरसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.
व्हिडीओ शेअर करताना आलियाने लिहिलं की, मी माझ्या हृदयाचा एक तुकडा तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक वर्ष उलटून गेले यावर विश्वास बसत नाही.
व्हिडीओची सुरुवात ही दिग्दर्शक अयान मुखर्जी आलिया भट्टला एक सीन समजावून सांगण्यापासून होते. तर व्हिडीओमध्ये आलियाचे अॅक्शन सीन, वाराणसी ट्रिप आणि रणबीर कपूरचे काही शॉट्स पाहायला मिळतात. शिवाय आलिया आणि रणबीर बर्फात हात धरून एकत्र चालताना दिसत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर #Ranlia चे चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ऑफ-स्क्रीन रोमान्स सुरू झाला होता.
दिग्दर्शक अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. रणबीरने शिवाची तर आलियाने ईशाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर सुमारे 431 कोटी रुपयांची कमाई केली. तर ब्रह्मास्त्र-2 आणि ब्रह्मास्त्र-3 2026 आणि 2027 मध्ये रिलीज होणार आहेत.