13 वर्ष लपवलं...आम्ही कझिन नाही, तर पार्टनर...! अखेर ‘अलीगढ’च्या लेखकाची कबुली!!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 11:14 AM2020-05-31T11:14:42+5:302020-05-31T11:18:14+5:30
गेल्या 13 वर्षांपासून अपूर्व व सिद्धांत यांना लोक कझिन म्हणून ओळखत होते. ते पार्टनर आहेत, हे काही मोजक्याच लोकांना ठाऊक होते.
बॉलिवूडचा दिग्गज लेखक, दिग्दर्शक व निर्माता अपूर्व असरानी अलीकडे एक शॉकिंग खुलासा केला. होय, गेल्या 13 वर्षांपासून रिलेशनशिपबद्दलची एक गोष्ट अपूर्वने लपवून ठेवली होती. पण अखेर 13 वर्षांनंतर त्याने खुलासा केलाच. सोशल मीडियावर त्याने आपल्या गे पार्टनर सिद्धांतसोबतचा एक फोटो शेअर करत त्याने त्याच्यासोबतच्या रिलेशनशिपची कबुली दिली.
For 13 years we pretended to be cousins so we could rent a home together. We were told 'keep curtains drawn so neighbors don't know 'what' you are'. We recently bought our own home. Now we voluntarily tell neighbors we are partners 💕. It's time LGBTQ families are normalised too. pic.twitter.com/kZ9t9Wnc7i
— Apurva (@Apurvasrani) May 29, 2020
‘गेल्या 13 वर्षांपासून सिद्धांत व मी आम्ही दोघे कझिन आहोत, असे लोकांना सांगत होतो. कारण आम्हाला घर भाड्याने हवे होते. आमच्या नात्याबद्दल कुणालाही कळू नये, यासाठी आम्हाला घराची दारखिडक्या बंद ठेवण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र आता त्याची गरज नाही. आम्ही दोघांनी एक घर खरेदी केलेय. आम्ही कझिन नसून पार्टनर आहोत, असे आम्ही शेजा-यांना सांगतो आहोत. समलैंगिक संबंधांना समाजमान्यता मिळवून देण्याची हीच ती वेळ आहे,’असे अपूर्वने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
गेल्या 13 वर्षांपासून अपूर्व व सिद्धांत यांना लोक कझिन म्हणून ओळखत होते. ते पार्टनर आहेत, हे काही मोजक्याच लोकांना ठाऊक होते. पण आता त्यांनी आपले रिलेशनशिप कन्फर्म केले आहे.
1995 to 2019. More than 2 decades of doing what I love. I've practically grown up in the movie industry 💗 pic.twitter.com/ny68LJbVDL
— Apurva (@Apurvasrani) March 12, 2019
अपूर्वच्या या पोस्टवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. यापैकी बहुतांश लोकांनी दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अपूर्व असरानीने सत्या, शाहिद, सिटीलाइट्स, अलीगढ, सिमरन अशा अनेक सुपरहिट सिनेमांसाठी लेखक व एडिटर म्हणून काम केले आहे. हंसल मेहता दिग्दर्शित अलीगड हा सिनेमा ख-या घटनांवर आधारित होता.
#NewProfilePicpic.twitter.com/yMUDdoPgpx
— Apurva (@Apurvasrani) April 25, 2020
कंगना राणौतसोबतच्या वादामुळे आला होता चर्चेत
पटकथा लेखक अपूर्व असरानी आणि अभिनेत्री कंगना राणौतचा वाद तसा जुनाच. ‘सिमरन’ या चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय घेण्यावरून अपूर्व असरानी आणि कंगना राणौत यांचे बिनसले होते. सिमरन या चित्रपटाची कथा अपूर्वने लिहिली आहे. पण अचानक चित्रपटाच्या कथालेखनाचे श्रेय कंगनाला विभागून दिले गेले. पटकथेचे सगळे श्रेय कंगना लाटत असलेली पाहून अपूर्व भलताच संतापला होता. कारण अपूर्वचे मानाल तर त्याने या कथेसाठी त्याच्या आयुष्याची दोन वर्षे दिली होती.