​आलियाचे न्यू इअर रेझ्युलेशन : जनावरांची सेवा करणे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 09:02 PM2017-01-05T21:02:54+5:302017-01-05T21:37:35+5:30

बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्टसाठी २०१६ साल हे लकी ठरले असेच म्हणावे लागेल. अनुराग कश्यपचा ‘उडता पंजाब’ , शाहरुख ...

Aliya's New Year Resolutions: Serving the Animals | ​आलियाचे न्यू इअर रेझ्युलेशन : जनावरांची सेवा करणे

​आलियाचे न्यू इअर रेझ्युलेशन : जनावरांची सेवा करणे

googlenewsNext
लिवूडची बबली गर्ल आलिया भट्टसाठी २०१६ साल हे लकी ठरले असेच म्हणावे लागेल. अनुराग कश्यपचा ‘उडता पंजाब’ , शाहरुख खान सोबतचा ‘डिअर जिंदगी’ व ‘कपूर अ‍ॅण्ड संस’ या तिनही  चित्रपटातील तिच्या अभिनयाची प्रशंसा करण्यात आली. विशेष म्हणजे आलिया भट्टला बेस्ट अ‍ॅक्ट्रेससाठी नामांकन मिळू शकते असे सांगण्यात येत आहे. आता नवीन वर्षात आलियाचा एकच चित्रपट रिलीज होत आहे. मात्र तिला याच्याशी काहीच करायचे नाही कारण २०१७ मध्ये जनावरांची सेवा करायचे आहे असे आलियाने खुद्द सांगितले आहे. 

एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आलियाने येणाºया वर्षातील चित्रपट व करिअरबद्दल माहिती दिली. आलिया म्हणाली, माझा २०१७ साली केवळ ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’ हाच एक चित्रपट प्रदर्शित होईल असे वाटतेय. यामुळे मी थोडी रिलॉक्स आहे, मात्र जेव्हा तुमच्याकडे चित्रपट नसतात तेव्हा स्वत:बद्दल बºयाच गोष्टी आपल्या कानावर पडतात. पण २०१७ सालात चित्रपटाशिवाय माझ्याजवळ करण्यासारखे बरेच काही आहे. माझ्याकडे भरपूर काम आहेत. मी एका संस्थेशी जुळलेली आहे, ते लोक चांगल्या पद्धतीने काम करू इच्छितात आणि समाज उपयोगी कामे करीत असतात. मी जनावारांच्या एका कॅम्पेनमध्ये सहभागी आहे. यावर्षी मी त्या कॅम्पेनला पूर्ण सर्पोट करणार आहे. 

alia bhatt new year resolution; work for animals

आलिया भट्ट बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे. अनेक चित्रपट निर्माते तिच्यासोबत काम करू करण्यास तयार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलियाजवळ अनेक चित्रपट आहेत. मात्र प्रदर्शनाच्या मार्गावर असलेला केवळ एक चित्रपट आहे. मात्र नव्या वर्षात आलियाने ठरविलेले कामही पूर्ण व्हावे व जास्तीत जास्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला यावे अशाच शुभेच्छा आपण देऊ शकतो. 

Web Title: Aliya's New Year Resolutions: Serving the Animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.