चित्रपटांची निवड करण्याबाबत या कारणांमुळे परिणीती चोप्रा झाली सिलेक्टिव्ह, जाणून घ्या…
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 05:25 PM2021-04-27T17:25:33+5:302021-04-27T17:41:16+5:30
परिणीती चोप्राने आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र चित्रपटांची निवड करताना सध्या विचारपूर्वक निर्णय घेते.
आपल्या अभिनयाने परिणीती चोप्राने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यावर दिग्गज अभिनेत्यांसह परिणीतीची केमिस्ट्री चांगलीच जुळली. आता परिणीती अधिक सिलेक्टीव्ह झाली आहे. केवळ ऑफर्स मिळतायेत म्हणून सिनेमा स्विकारणार नसल्याचे तिने म्हटले आहे. कोरोनामुळे जसे आयुष्य बदलले तसेच अनेक गोष्टी आता यानंतरही बदलणार आहेत. परिणीतीने आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र चित्रपटांची निवड करताना सध्या विचारपूर्वक निर्णय घेते. चित्रपटात नवनवीन गोष्टी करण्याच्या विचाराने तसं केल्याचंही ती सांगते. मात्र आता चित्रपटांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घेते असं परिणीतीने म्हटलं आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर मनोरंजनसृष्टीवरही झाला आहे.मनोरंजन क्षेत्राचेही कोरानाने कंबरडे मोडले असताना अगदी ताजे विषय पाहण्यात रस असेल आणि नाविन्य नसलेले विषय धुडकावून लावतील असे मत परिणीती चोप्राने मांडले आहे.“आजचा जमाना कथानकाचा आहे आणि अपेक्षेनुरूप नसलेल्या गोष्टी यापुढे स्वीकारल्या जाणार नाहीत, कारण प्रेक्षकांना जगभरातून निराळी, दमदार कथानके उपलब्ध झाली आहेत. हे आम्ही म्हणजे अभिनेते तसेच फिल्म-मेकर्सनी लक्षात घेतले पाहिजे,” असे परी म्हणते.
ती सांगते, “मी स्वत: दमदार कथानक असलेल्या प्रोजेक्टकडे आकर्षित झाले. मला धरून, माझ्या सभोवताली असणारी प्रत्येक व्यक्ती दर्जेदार फिल्म्स आणि शो’ना पसंती देत असल्याचे माझ्या लक्षात आले. तर एखाद्याने काहीतरी एव्हरेज का बघायला लागावे.”हिंदी सिनेमा उद्योगाकरिता ही मोठी शिकवण ठरणार असल्याचे परीला वाटते. अॅनिमलच्या संहितेप्रमाणे अतिशय भक्कम कथासूत्राची निवड आपण करणार असल्याचे ती स्पष्ट करते. रणबीर कपूरसोबत परी अॅनिमल’मध्ये झळकणार आहे.
ती सांगते, “माझ्या मते सध्याच्या महासाथीत सिने-उद्योगाला याची जाणीव झाली पाहिजे. आताची स्थिती पार बदलली आहे. आगामी काळात आपल्याला प्रेक्षकांना थक्क करणारे सिनेमे तयार करावे लागणार आहेत. महासाथीने प्रेक्षकांची आवड बदलून टाकली आहे. त्यांना जे पाहिजे त्याचा आदर केला पाहिजे.”
परी पुढे सांगते, “माझे अॅनिमलसह आगामी काळातील सर्व प्रोजेक्टचे विषय हे अभिनव आणि समाजाला अनुसरुनच असतील. प्रेक्षकांना ते नक्कीच आवडतील. किंबहुना ते प्रेमात पडतील. मी लोकांना धमाल मजा येईल अशा संहितांच्या शोधात आहे.”