Allu Arjun : सर्वात जास्त फॉलो केला जाणारा स्टार बनला अल्लू अर्जुन, रजनीकांतलाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:51 PM2022-02-03T14:51:38+5:302022-02-03T14:51:55+5:30

Allu Arjun : सोशल मीडियावरही पुष्पा या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. सिनेमातील गाणी, डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सवर लोक रील्स बनवत आहे.

Allu Arjun has more followers than Rajinikanth and Chiranjeevi on twitter | Allu Arjun : सर्वात जास्त फॉलो केला जाणारा स्टार बनला अल्लू अर्जुन, रजनीकांतलाही टाकलं मागे

Allu Arjun : सर्वात जास्त फॉलो केला जाणारा स्टार बनला अल्लू अर्जुन, रजनीकांतलाही टाकलं मागे

googlenewsNext

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) 'पुष्पा - द राइज' (Pushpa) केवळ साऊथ इंडियातच नाहीतर देशाच्या  सर्वच भागांमध्ये मोठा लोकप्रिय झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत. सोशल मीडियावरही या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. सिनेमातील गाणी, डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सवर लोक रील्स बनवत आहे.

या सिनेमाच्या रिलीजनंतर अभिनेता अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. अल्लू अर्जुनने आता साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांना एका बाबतीत मागे टाकलं आहे. रजनीकांत यांना मागे टाकत अल्लू अर्जुन ट्विटरवर सर्वात जास्त फॉलो केला जाणारा साऊथचा स्टार बनला आहे.

अल्लू अर्जुनच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या ६.५ मिलियन इतकी झाली आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे अल्लू अर्जुन कुणालाही फॉलो करत नाही. दुसऱ्या नंबरवर सुपरस्टार रजनीकांत आहेत. त्यांचे ६.१ मिलियन फॉलोअर्स आहेत. रजनीकांत मुलगी ऐश्वर्या रजनीकांत, धनुष, अमिताभ बच्चनसहीत २४ लोकांना फॉलो करतात. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे चिरंजीवी. त्यांचे १.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. 

एका मुलाखतीत पुष्पा स्टारर रश्मिका मंदानाने खुलासा केला की, 'पुष्पा द राइज' चा दुसरा पार्ट 'पुष्पा द रूल' चं शूटिंग मार्च महिन्यात सुरू होणार आहे. हा दुसरा सिनेमा यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होऊ शकतो. 
 

Web Title: Allu Arjun has more followers than Rajinikanth and Chiranjeevi on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.