RRR सिनेमा पाहिल्यावर भारावून गेला अल्लू अर्जुन, बघा ट्विट करत काय म्हणाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 04:55 PM2022-03-26T16:55:18+5:302022-03-26T16:57:55+5:30
RRR सिनेमाने वर्ल्डवाइड एका दिवसात २२३ कोटी रूपयांची कमाई केली. अनेक सेलिब्रिटीही या सिनेमाबाबत बोलत आहेत. यात अल्लू अर्जुनने सुद्धा ट्विट करत या सिनेमाचं कौतक केलं आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित RRR हा सिनेमा अखेर सिनेमागृहात रिलीज झाला. समीक्षकांसोबतच प्रेक्षक या सिनेमाचं भरभरून कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळे ट्रेन्ड बघायला मिळत आहे. इतकंच नाही तर या सिनेमाने एका दिवसात कमाईचा रेकॉर्डही तोडला आहे. या सिनेमाने वर्ल्डवाइड एका दिवसात २२३ कोटी रूपयांची कमाई केली. अनेक सेलिब्रिटीही या सिनेमाबाबत बोलत आहेत. यात अल्लू अर्जुनने (Allu Arjun) सुद्धा ट्विट करत या सिनेमाचं कौतक केलं आहे.
'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुनने दोन ट्विट करत दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli), रामचरण (Ramcharan), ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे. रामचरणचे वडील अभिनेते चिरंजीवी यांनीही सिनेमाचं खूप कौतुक केलं.
Hearty Congratulations to the Entire team of #RRR . What a spectacular movie. My respect to our pride @ssrajamouli garu for the vision. Soo proud of my brother a mega power @AlwaysRamCharan for a killer & careers best performance. My Respect & love to my bava… power house
— Allu Arjun (@alluarjun) March 26, 2022
@tarak9999 for a spectacular show. Brilliant Presence by respected @ajaydevgn Garu & our sweetest @aliaa08 . And my spl wishes to @mmkeeravaani garu, @DOPSenthilKumar garu, Dvv Danayya garu & many others. Thank you all for making INDIAN CINEMA proud. This is a Kille R R R !
— Allu Arjun (@alluarjun) March 26, 2022
या सिनेमाने वर्ल्डवाइड एका दिवसात २२३ कोटी रूपयांची कमाई केली आहे. राजामौली यांच्या बाहुबलीने पहिल्या दिवशी वर्ल्डवाइड ७५ कोटी रूपयांची कमाई केली होती आणि बाहुबली २ ने २१७ कोटी रूपयांची कमाई केली होती. आता RRR ने हा रेकॉर्ड मोडला आहे.
तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, सिनेमाने आंध्र प्रदेशात ७५ कोटी रूपये, निझाममध्ये २७.५ कोटी रूपये, कर्नाटकात १४.५ कोटी रूपये, तामिळनाडूमध्ये १० कोटी रूपये, केरळमध्ये ४ कोटी रूपये आणि नॉर्थ इंडियात २५ कोटी रूपये कमाई केली. तर यूएसमध्ये या सिनेमाने ४२ कोटी रूपयांची कमाई केली तसेच इतर देशांमध्ये २५ कोटी रूपयांची कमाई केली. अशाप्रकारे या सिनेमाने एकूण २२३ कोटी रूपयांची कमाई केली.