ऐकल का? ‘मीटू’वरील चित्रपटात आलोक नाथ बनणार जज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 12:29 PM2019-03-01T12:29:28+5:302019-03-01T12:30:53+5:30

‘मीटू’ मोहिमेने गतर्षी बॉलिवूड ढवळून निघाले. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ आलोक नाथ हेही या वावटळीत सापडले. आता हेच आलोक नाथ ‘मीटू’ मोहिमेवर आधारित एका चित्रपटात जजची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

alok nath plays a judge in film based on sexual harassment metoo | ऐकल का? ‘मीटू’वरील चित्रपटात आलोक नाथ बनणार जज!!

ऐकल का? ‘मीटू’वरील चित्रपटात आलोक नाथ बनणार जज!!

googlenewsNext
ठळक मुद्दे विनता नंदा यांनी मीटू मोहिमेअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी पोस्ट लिहिली होती.

मीटू’ मोहिमेने गतर्षी बॉलिवूड ढवळून निघाले. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज ‘मीटू’च्या वावटळीत अडकलेत. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ आलोक नाथ हेही या वावटळीत सापडले. निर्मात्या-लेखिका विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. केवळ इतकेच नाही तर याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पुढे सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशननेही त्यांच्यावर बंदी लादली. आता हेच आलोक नाथ ‘मीटू’ मोहिमेवर आधारित एका चित्रपटात जजची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
होय, हा मोठा विरोधाभास असला तरी बातमी खरी आहे. खुद्द आलोक नाथ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘मीटू’ मोहिमवर आधारित ‘मैं भी’ या चित्रपटात आलोक नाथ जजच्या भूमिकेत दिसतील. नासीर खान हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत.
यासंदर्भात आलोक नाथ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. होय, मी या चित्रपटात आहे. तुम्हाला काही त्रास आहे का की मी या चित्रपटात दिसणार, याचे तुम्हाला दु:ख वाटतेय? असा उलट सवाल त्यांनी केला. मी सध्या कुठल्याही चित्रपटात काम करत नाहीये. पण या चित्रपटाचे शूटींग आधीच पूर्ण झाले होते. एका गरिब निर्मात्यांच्या शब्दाखातर मी ही भूमिका स्वीकारली. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ द्या, असे ते म्हणाले.
 विनता नंदा यांनी मीटू मोहिमेअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी पोस्ट लिहिली होती. एका पाटीर्नंतर मी एकटी घरी जात होते. त्यांनी मला लिफ्ट देण्याची आॅफर दिली. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि कारमध्ये बसले. त्यानंतरचे मला अंधूक आठवते. मला जेव्हा जाग आली तेव्हा मला वेदना होत होत्या. मी बेडवरुन उठू शकले नाही. याबद्दल मी माज्या मित्रांना सांगितले, परंतु सर्वांनी या घटनेला कायमचे विसरुन जाण्याचा सल्ला दिला, असे नंदा यांनी म्हटले होते. केवळ विनता नंदानंतर अन्य काही महिलांनीही आलोक नाथ यांच्यावर गैरतर्वनाचे आरोप केले होते.
 

Web Title: alok nath plays a judge in film based on sexual harassment metoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.