स्क्रिप्टमध्ये नसतानाही या अभिनेत्रीनं केला लिपलॉक सीन, मग केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 05:27 PM2019-07-30T17:27:09+5:302019-07-30T17:27:30+5:30

या अभिनेत्रीच्या लिपलॉक सीनची सगळीकडे खूप चर्चा झाली होती.

Amala Paul On Controversial lip-lock scene In Aadai | स्क्रिप्टमध्ये नसतानाही या अभिनेत्रीनं केला लिपलॉक सीन, मग केला हा खुलासा

स्क्रिप्टमध्ये नसतानाही या अभिनेत्रीनं केला लिपलॉक सीन, मग केला हा खुलासा

googlenewsNext


अभिनेत्री अमला पॉल हिने आदाई चित्रपटातील किसिंग व न्यूड सीनमुळे खूप चर्चेत आली. त्यात आता नुकतंच तिने केलेल्या एका स्टेटमेंटमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. या चित्रपटातील स्क्रीप्टमध्ये किसचा सीन नसतानाही तिने सहकलाकार रम्या सुब्रहमण्यमला किस केले होते, असा खुलासा तिने केला आहे. त्या दोघांच्या ट्रेलरमधील लीपलॉक सीनची चर्चा सगळीकडे खूप झाली होती. 

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, लिपलॉक सीनविषयी अमला पॉल हिने डेक्कन क्रोनिकलला सांगितलं की, मुलीला किस केलं तर त्यात काय चुकीचं आहे.  हा सीन उत्स्फूर्तपणे चित्रीत झाला आणि स्क्रीप्टमध्ये या सीनचा समावेशही होता. एकदा तुम्ही त्या पात्रात प्रवेश केला की तुमचा कलाकार जागा होतो. या किसिंग सीनला लोकांनी खूप ट्रोल केलं. पण हा किसिंग सीन का आहे हे समजून घेण्यासाठी चित्रपट पाहणं गरजेचं आहे.


आदाई चित्रपटात अमलाने कामिनीची भूमिका साकारली असून तिने या सीनबद्दल जेव्हा तिच्या आईला सांगितलं. तेव्हा त्यांना धक्काच बसला. अमला म्हणाली की, मी अम्माला चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली आणि तिला धक्काच बसला. पण ती म्हणाली की जर कथेची गरज असेल तर विचार कर आणि ऑफर स्वीकार. 


आदाई चित्रपटाची कथा कामिनी नामक मुलीभोवती फिरते. तिला आपल्या अटींवर जीवन व्यतित करायचे असते. एक दिवस ऑफिस पार्टीत एक घटना घडते. त्यानंतर तिचं आयुष्य बदलून जातं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सोशल मीडियावर न्यूड सीनमुळे खूप वाद झाले. सोशल मीडियावरील युजर्सनं ट्रोल केलं होतं. काही सेलेब्रिटी पुढे सरसावले आणि अमालाचं कौतूक केलं होतं. 

Web Title: Amala Paul On Controversial lip-lock scene In Aadai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.