​या मराठी चित्रपटापासून अमरिश पुरी यांनी केली होती त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 10:21 AM2018-01-12T10:21:29+5:302018-01-12T15:51:29+5:30

अमरिश पुरी यांनी एक खलनायक म्हणून बॉलिवूडमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी केवळ खलनायक म्हणूनच नव्हे ...

Amarish Puri started his career with this Marathi film | ​या मराठी चित्रपटापासून अमरिश पुरी यांनी केली होती त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात

​या मराठी चित्रपटापासून अमरिश पुरी यांनी केली होती त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात

googlenewsNext
रिश पुरी यांनी एक खलनायक म्हणून बॉलिवूडमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी केवळ खलनायक म्हणूनच नव्हे तर साहाय्यक अभिनेता म्हणून देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या. मिस्टर इंडिया या चित्रपटातील त्यांनी साकारलेली मॉगँम्बोची भूमिका तर प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. तसेच नागिन, परदेस, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, विरासत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे आजही कौतुक केले जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत चारशेहून देखील अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 
अमरिश पुरी यांनी बॉलिवूडमध्ये खूपच चांगल्या भूमिका साकारल्या असल्या तरी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात एका मराठी चित्रपटापासून केली होती. अमरिश पुरी मराठी चित्रपटात झळकले होते हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हे खरे आहे अमरिश पुरी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका मराठी चित्रपटात झळकले होते. १९६७ला प्रदर्शित झालेल्या शांतता कोर्ट चालू आहे या चित्रपटात रेल्वेच्या डब्यात गाणे गाणाऱ्या एका अंध व्यक्तीची भूमिका त्यांनी साकारली होती. अमरिश पुरी यांच्या आधी त्यांचे भाऊ मदन पुरी आणि चमन पुरी बॉलिवूडमध्ये काम करत होते. आपल्या भावांप्रमाणे आपण देखील अभिनयाक्षेत्रात करियर करावे अशी अमरिश पुरी यांची इच्छा होती. पण पहिल्याच स्क्रीन टेस्टमध्ये त्यांना नकार पचवावा लागला. त्यामुळे आपले अभिनयात काहीही होऊ शकत नाही असा विचार करून त्यांनी एम्प्लाइज स्टेट इन्शोरन्स कॉर्पोरेशनमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यानंतर शांतता कोर्ट चालू आहे या चित्रपटानंतर त्यांनी रेशमा और शेरा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या रहमत खान या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
अमरिश पुरी यांचा जन्म २२ जून १९३२ ला पंजाबमधील नवांशहर येथे झाला होता तर त्यांचे निधन १२ जानेवारी २००५ ला मुंबईत झाले. त्यांच्या निधनाला आज अनेक वर्षं झाले असले तरी त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ताज्या आहेत. 

Also Read : अमरीश पुरी यांचा नातू बनला मराठी चित्रपटाचा निर्माता!

Web Title: Amarish Puri started his career with this Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.