माहित नसेल तर माहित करून घ्या कोण आहे कॅरी मिनाटी? का सोशल मीडियावर होतोय ट्रेंड?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 11:42 AM2020-05-10T11:42:37+5:302020-05-10T12:21:30+5:30
नव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव नवे नाही. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर.
होय, सोशल मीडियावर सध्या युट्यूब विरूद्ध टिक टॉक ट्रेंड होतेय. सोबत कॅरी मिनाटी हे नाव तर जबरदस्त ट्रेंडमध्ये आहे. याचे कारण म्हणजे, कॅरीने एक व्हिडीओ शेअर केला आणि सोशल मीडियाव टिक टॉक विरूद्ध युट्यूब हे युद्ध रंगले. पाठोपाठ या युद्धावरच्या भन्नाट मीम्सचा जणू पूर आला.
आता या युद्धाला तोंड फोडणारा आणि सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंडमध्ये असणारा कॅरी कोण हे जरा जाणून घेऊ या...
तसे नव्या पिढीला कॅरी मिनाटी हे नाव नवे नाही. तो युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर. कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. फरीदाबादचा या अजयचे युट्यूबवरCarryMinati और CarryIsLive अशी दोन चॅनल्स आहेत़
युट्यूब करिअरसाठी कॅरीने मध्येच शिक्षण सोडले. होय, अगदी 12 वी परीक्षा न देण्याचा निर्णय त्याने घेतला. अर्थात पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले, हा भाग वेगळा.
अजय नागर कॅरी मिनाटी नावाने युट्यूबवर लोकप्रिय आहे. युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी तो ओळखला जातो.
वयाच्या 10 व्या वर्षापासून कॅरीने युट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणे सुरु केले होते. अगदी सुरुवातीला सनी देओलची मिमिक्री करणारा व्हिडीओ त्याने पोस्ट केला होता. 2014 मध्ये त्याने कॅरीमिनिटी हे मूळ युट्यूब चॅनल सुरु केले. 2017 मध्ये CarryIsLive आणखी एक युट्यूब चॅनल उघडले.
कॅरीने जानेवारी 2019 मध्ये युट्यूबपर Pewdiepie विरोधात ‘Bye Pewdiepie’ नावाने एक डिस गाणे साद केले होते. ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. 24 तासांत या गाण्याला 5 मिलियन व्ह्युज मिळाले होते. 2019 या सालात टाईम मॅगझिनद्वारा नेक्स्ट जनरेशन लीडर्स 2019 व्या यादीत कॅरी दहाव्या क्रमांकावर होता. इनोव्हेटिव्ह करिअर करणा-या युवांची ही यादी टाईम मॅगझिन दरवर्षी प्रसिद्ध करते.
पाहु या कॅरीचे काही लोकप्रिय व्हिडीओ