सुशांतचा मृतदेह आणायला अॅम्ब्युलन्स गेली, पण...; चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 11:12 AM2020-08-04T11:12:51+5:302020-08-04T11:13:19+5:30
सुशांतचा मृतदेह आणण्यासाठी गेलेल्या अॅम्बुलन्स चालकाने त्या दिवशी काय घडले, याबद्दलचा खुलासा केला आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून बरेच मोठे खुलासे होत आहेत. त्यात त्याचा कुक, जीम ट्रेनर व जवळचा बॉडीगार्ड यांनी त्याच्या संदर्भातील काही गोष्टी सांगितल्यानंतर आता सुशांतचा मृतदेह आणण्यासाठी गेलेल्या अॅम्बुलन्स चालकाने त्या दिवशी काय घडले, याबद्दलचा खुलासा केला आहे.
अॅम्ब्युलन्सचे मालक राहुल यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. त्या दिवशी ते गावी होते. त्यामुळे त्यांचा भाऊ अक्षय अॅम्ब्युलन्स घेऊन सुशांतच्या घरी गेले होते.
अक्षय यांनी पाहिले की, सुशांतच्या आत्महत्येनंतर त्यांचा मृतदेह सीलिंगवरून काढून खाली बेडवर ठेवण्यात आला होता. ज्यानंतर अॅम्ब्युलन्समधील कर्मचारीने सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह स्ट्रेचरवर घेऊन इमारती खाली आणला. अॅम्ब्युलन्सच्या व्हीलचेअरमध्ये काही तरी बिघाड आल्यामुळे सुशांतचा मृतदेह अॅम्बुलन्समध्ये नीट राहत नव्हता. त्यामुळे दुसरी अॅम्ब्युलन्स बोलवण्यात आली.
पाटण्यात सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत आणि ते या प्रकरणाचा तपास लावत आहेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आणि रिया चक्रवर्तीने याबाबत आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी बिहार पोलिसांना मुंबईत तपासाबाबत नकार दर्शवला आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला मुंबईत आलेल्या सर्व बिहार पोलिसांना महानगरपालिका होम क्वारंटाईन करण्याच्या तयारीत आहेत. पण,अद्यापही कोणा एका अज्ञात स्थळी असल्यामुळे बिहार पोलिसांच्या वास्तव्याचे ठिकाण कळू शकलेले नाही.