Ameesha Patel Birthday : वयाची चाळीशी उलटूनही अमिषा पटेल अद्याप आहे सिंगल, एकेकाळी होती या दिग्दर्शकाच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 11:46 AM2023-06-09T11:46:36+5:302023-06-09T11:47:17+5:30

Ameesha Patel Birthday : एक काळ असा होता जेव्हा अमिषा पटेलच्या लव्ह लाईफची खूप चर्चा व्हायची. तिचे नाव विक्रम भट ते रणबीर कपूर यांच्याशी जोडले गेले होते पण वयाच्या ४७ व्या वर्षीही अमिषा पटेल सिंगल आहे.

Ameesha Patel Birthday : Ameesha Patel is still single in her forties, once in love with the director | Ameesha Patel Birthday : वयाची चाळीशी उलटूनही अमिषा पटेल अद्याप आहे सिंगल, एकेकाळी होती या दिग्दर्शकाच्या प्रेमात

Ameesha Patel Birthday : वयाची चाळीशी उलटूनही अमिषा पटेल अद्याप आहे सिंगल, एकेकाळी होती या दिग्दर्शकाच्या प्रेमात

googlenewsNext

२००० साली हृतिक रोशनसोबत 'कहो ना...प्यार है' या चित्रपटातून पदार्पण करणारी अमिषा पटेल (Ameesha Patel) ९ जून रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ती ४७ वर्षांची आहे आणि या २३ वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक चढउतार पाहिले आहेत. या करिअरमध्ये तिचे नाव विक्रम भट ते आलिया भटचा पती रणबीर कपूर यांच्याशी जोडले गेले. 

अमिषा पटेलने लग्न का केले नाही?
वयाच्या ४७ व्या वर्षीही अमिषा पटेल सिंगल आहे. आजपर्यंत तिने लग्न केले नाही, पण एक काळ असा होता जेव्हा तिचे नाव अनेक प्रसिद्ध व्यक्तींसोबत जोडले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर तिने लग्न केले नाही, असे सांगितले जाते. आता ती अविवाहित असूनही जास्त आनंदी आहे. तिचा विश्वास आहे की आनंदी राहण्यासाठी कोणाची तरी गरज नाही.

अनेक वेळा जाहीरपणे व्यक्त केले प्रेम
अमिषा पटेलचे विक्रम भटसोबत चांगले संबंध होते. दोघांनी एकमेकांना ५ वर्षे डेट केले होते. अमिषा पटेलने पदार्पणापूर्वीच विक्रम भट यांची भेट घेतली होती. १९९९ मध्ये 'आप मुझे अच्छे लगने लगे' या चित्रपटादरम्यान हा प्रकार घडला होता. हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. विक्रम भट आणि अमिषा पटेल यांनी त्यांचे प्रेम कधीच लपवले नाही. त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे आपले प्रेम व्यक्त केले होते. विक्रम भटने एकदा अमिषा पटेलसोबतच्या रिलेशनशीपबद्दल सांगितले होते. ती तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करते आहे आणि मी तिच्यावर . मी या नात्यासाठी तयार आहे. मी जास्त बोलणार नाही, असे त्याने म्हटले होते. 

५ वर्षे डेट केल्यानंतर झाले ब्रेकअप 
५ वर्षे डेट केल्यानंतर विक्रम भट आणि अमिषा पटेलचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपवर विक्रम भट्ट म्हणाले होते, 'मला वाटत नाही की आम्ही कधी एकमेकांवर प्रेम केले. अमिषाला स्वतःच्या आणि आई-वडिलांच्या अनेक समस्या होत्या. आम्ही फक्त एकमेकांशी बोलायचो. आम्ही आमच्या कारकिर्दीत यशाच्या शिखरवर नसताना भेटलो. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. प्रेम नाही. मित्र नेहमीच असे असतात.

रणबीर कपूरसोबतही जोडले गेले होते नाव
एवढेच नाही तर अमिषा पटेलचे नाव आलिया भटचा नवरा आणि नीतू कपूरचा लाडका अभिनेता मुलगा रणबीर कपूरसोबतही जोडले गेले. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, अमिषा रणबीरसाठी खूप काळजीत होती. पण लिंक-अपची बातमी रणबीरला समजताच त्याने माघार घेतली. मात्र, या वृत्तांना कधीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यांच्याकडे फक्त गॉसिप्सच्या दृष्टिकोनातूनच पाहिले जाते.

Web Title: Ameesha Patel Birthday : Ameesha Patel is still single in her forties, once in love with the director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.