'गोविंदाचा बेवकुफ दोस्त' मराठमोळ्या अमेयला विकी म्हणतो, 'मित्रा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 08:47 AM2022-11-23T08:47:14+5:302022-11-23T08:49:27+5:30

गोविंदा नाम मेरा मध्ये गोविंदाचा बेवकुफ दोस्त ही भुमिका अमेय करत आहे ज्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

amey-wagh-marathi-actor-will-be-seen-in-naam-mera-govinda-with-vicky-kaushal | 'गोविंदाचा बेवकुफ दोस्त' मराठमोळ्या अमेयला विकी म्हणतो, 'मित्रा...'

'गोविंदाचा बेवकुफ दोस्त' मराठमोळ्या अमेयला विकी म्हणतो, 'मित्रा...'

googlenewsNext

बॉलिवुड अभिनेता विकी कौशलचा आगामी गोविंदा नाम मेरा हा सिनेमा चर्चेत आहे. ट्रेलर पाहून विकीचे चाहते फारच उत्सुक आहेत कारण पहिल्यांदाच विकी अशाप्रकारची विनोदी भुमिका साकारणार आहे. पण आपला मराठीतला वाघही कुठे कमी नाही. कोण वाघ तर आपला सर्वांचा लाडका अमेय वाघ. गोविंदा नाम मेरा मध्ये गोविंदा चा बेवकुफ दोस्त ही भुमिका अमेय करत आहे ज्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

मराठी अभिनेता अमेय वाघनेहिंदी सिरीज, हिंदी सिनेमामध्ये याआधीही काम केले आहे. आता गोविंदा नाम मेरा मध्ये अमेय वकिलाची भुमिका साकारतोय. तसंच तो गोविंदा म्हणजेच विकी चा बेवकुफ दोस्त असणार आहे. भावा तुझीच हवा, कडक, अशा शब्दात मराठी कलाकारांनी अमेयला शुभेच्छा दिल्या आहेत. तर एक कमेंट लक्ष वेधुन घेते ती म्हणजे विकी कौशलची. मित्रा, तुझ्यासोबत काम करुन खूपच मजा आली. भेटुया लवकर, अर्धी मराठी आणि अर्धी इंग्रजीमध्ये विकी ने कमेंट केली आहे. 

ट्रेलर बघुन तर सिनेमाची उत्सुकता खुपच ताणली आहे. त्यात अमेय आहे म्हणल्यावर धमाल तर येणारच.शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केलेला आणि करण जोहरने निर्मित केलेला गोविंदा नाम मेरा १६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: amey-wagh-marathi-actor-will-be-seen-in-naam-mera-govinda-with-vicky-kaushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.