घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हार्दिकची पत्नी नताशाने शेअर केला व्हिडिओ, म्हणते- "मला तुम्हाला सांगायचं आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 03:27 PM2024-07-04T15:27:00+5:302024-07-04T15:27:22+5:30

हार्दिक-नताशामध्ये बिनसल्याच्या आणि त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. असं असताना टी-२० वर्ल्ड कपदरम्यानही नताशा दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. अशातच नताशाने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

amid divorce rumours cricketer hardik pandya wife natasa stankovic shared video | घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हार्दिकची पत्नी नताशाने शेअर केला व्हिडिओ, म्हणते- "मला तुम्हाला सांगायचं आहे की..."

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हार्दिकची पत्नी नताशाने शेअर केला व्हिडिओ, म्हणते- "मला तुम्हाला सांगायचं आहे की..."

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टँकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. IPL नंतर या चर्चा सुरू झाल्या होत्या. IPL दरम्यान नताशा हार्दिकला चिअर करताना दिसली नाही. तिने त्याच्यासाठी पोस्टही केली नव्हती. त्यामुळेच हार्दिक-नताशामध्ये बिनसल्याच्या आणि त्यांच्यात दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. असं असताना टी-२० वर्ल्ड कपदरम्यानही नताशा दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. अशातच नताशाने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

नताशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती म्हणते, "मी आज असं काही वाचलं जे ऐकण्याची मला गरज होती. आणि म्हणूनच मी है बायबल माझ्याबरोबर कारमध्ये घेऊन आले आहे. मला हे तुम्हालादेखील सांगायचं आहे". पुढे नताशा बायबलमधील काही ओळी वाचून दाखवते. त्यात असं लिहिलं आहे की, "देव नेहमी तुमच्याबरोबर असेल, तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, तुमची साथ सोडणार नाही. घाबरू नका आणि निराश होऊ नका". 

"जेव्हा आपण एखाद्या परिस्थितीतून जात असतो तेव्हा आपण निराश, हताश, दु:खी आणि हरवलेले असतो. देव तुमच्याबरोबर आहे. तुमच्याबरोबर काय घडत आहे, हेदेखील त्याला माहीत आहे. पण, त्याला आश्चर्य वाटत नाही. कारण, त्याच्याकडे तुमच्यासाठी पुढची योजना आहे. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही", असंही नताशा पुढे व्हिडिओत म्हणताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओमुळे हार्दिक आणि नताशामध्ये खरंच बिनसलंय का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 

हार्दिक आणि नताशाने ३१ मे २०२० रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर काहीच महिन्यांत नताशाने अगस्त्य या त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. अनेकदा नताशा हार्दिक आणि अगस्त्यबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायची. IPL दरम्यान सहानुभुती मिळवण्यासाठी हार्दिक-नताशाने घटस्फोटाचा स्टंट केल्याचं म्हटलं जात होतं. पण, वर्ल्डकपमध्येही नताशा कुठेच न दिसल्याने पुन्हा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत अद्याप हार्दिक किंवा नताशाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  

Web Title: amid divorce rumours cricketer hardik pandya wife natasa stankovic shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.