आपल्या या ड्रीम प्रोजेक्टवर काम करतोय आमिर खान ?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 11:17 AM2018-01-15T11:17:36+5:302018-01-15T16:47:36+5:30
मिस्टर पकफेक्शनिस्ट आमिर खान सध्या आपला आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याची हिरोईन कॅटरिना कैफ ...
म स्टर पकफेक्शनिस्ट आमिर खान सध्या आपला आगामी चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याची हिरोईन कॅटरिना कैफ असणार आहे. आमिरने आपली आतापर्यंतची मोठी इच्छा व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आमिरने महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा अनेक वेळा बोलून दाखवली आहे. महाभारतातल्या पात्रांपैकी आमिरला भागवान कृष्णाची भूमिका साकारायची आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रोजेक्टवर काम सुरु करण्यासाठी तो घाबरतो आहे. एका इंटरव्ह्रु दरम्यान आमिर म्हणाला होता, मला माझ्या भूमिकेला न्याय द्यायला आहे. महाभारतातील कृष्ण ही भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे तो या प्रोजेक्टबाबत गंभीरतेने विचार करतो आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आमिर त्याची गेली अनेक वर्षांची ही इच्छा पूर्ण करणार असल्याचे कळते आहे. स्पॉटब्वॉय या वेबसाईटच्या माहितीनुसार आमिर खानने आपला महत्त्वाकांक्षी चित्रपट महाभारतवर काम करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटला पाच भागांमध्ये तयार करण्यात येणार आहे. याचा अर्थ येणारी पुढची दहा वर्षे आमिर या चित्रपटावर काम करणार आहे. ‘सीक्रेट सुपरस्टार’फेम दिग्दर्शक अद्वैत चंदन ‘महाभारत’ फ्रेचाईजी दिग्दर्शित करतील आणि आमिर याचा निर्माता असेल.
आमिर एकावेळी एकाच चित्रपटावर लक्षकेंद्रीत करतो हे आपल्या सगळ्यांच ठाऊक आहे. कोणताही चित्रपट साईन करण्यापूर्वी तो त्या भूमिकेसाठी शारिरीक आणि मानसिक तयारी करतो. भगवान कृष्णाची भूमिका साकारण्यासाठी त्याला शारिरीक दृष्ट्या खूप मेहनत करावी लागले.
ALSO READ : ... आणि आमिर खानच्या दोन्ही पत्नी दिसल्या एकत्र
आमिर खानचा ठग्स ऑफ हिंदोस्तान हा 2018च्या दिवाळीपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशराज बॅनर खाली तयार होणाऱ्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि आमिर खान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. चित्रपटात बिग बी आमिर खानच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांने माल्टामध्ये जाऊन ट्रेनिंग घेतले आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन विजय कृष्णा आर्चाय करत आहेत. तर आदित्य चोप्रा चित्रपटाचे प्रॉडक्शनचे काम बघणार आहेत.