'गदर २' च्या ट्रेलर लाँचला अमिषा पटेल जाणार नाही? सनी देओलची ऑनस्क्रिन सून आहे यामागचं कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 12:40 PM2023-07-26T12:40:46+5:302023-07-26T12:43:38+5:30

रिपोर्टनुसार, अभिनेत्री अमिषा पटेल या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला उपस्थित राहणार नाही.

Amisha patel will not attend the trailer launch event of gadar 2 because simrat kaur video on social media | 'गदर २' च्या ट्रेलर लाँचला अमिषा पटेल जाणार नाही? सनी देओलची ऑनस्क्रिन सून आहे यामागचं कारणीभूत

'गदर २' च्या ट्रेलर लाँचला अमिषा पटेल जाणार नाही? सनी देओलची ऑनस्क्रिन सून आहे यामागचं कारणीभूत

googlenewsNext

सनी देओलअमिषा पटेल स्टारर चित्रपट गदर २ लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे तारा आणि सकीना २२ वर्षानंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेल 2001 मध्ये रिलीज झालेल्या 'गदर' चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून 'गदर २' हा या चित्रपटाचा सिक्वेल आहे. आता 'गदर 2' बद्दल एक मोठी बातमी येत आहे. रिपोर्टनुसार, अभिनेत्री अमिषा पटेल या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला उपस्थित राहणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की 'गदर 2' चा ट्रेलर आज 26 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री सिमरत कौरमुळे अमिषा पटेल 'गदर 2' च्या ट्रेलर लॉन्चला उपस्थित राहणार नाही.  काही काळापूर्वी सिमरत कौरच्या काही बोल्ड क्लिप व्हायरल झाल्या होत्या, ज्यामध्ये अभिनेत्री एका साउथ चित्रपटात इंटिमेट सीन देताना दिसली होती. या क्लिप समोर आल्यानंतर सिमरत कौरला खूप ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी अमिषा पटेलने सिमरत कौरला पाठिंबा दिला होता त्यामुळे तीही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. आता चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी तिला सिमरतशी संबंधित प्रश्नांना सामोरे जावे लागणार असल्याचे अमिषाला वाटते. त्यामुळे अभिनेत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहू इच्छित नाही.

चित्रपटाच्या पहिल्या भागात म्हणजे 'गदर: एक प्रेम कथा' मध्ये, तारा सिंगने आपली पत्नी सकीनाला परत आणण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमा ओलांडली. त्याचवेळी या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये तो मुलगा चरणजीतला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा सीमा ओलांडताना दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Web Title: Amisha patel will not attend the trailer launch event of gadar 2 because simrat kaur video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.