'सत्य कायमचे अंधारात...', PM नरेंद्र मोदींनंतर अमित शाह यांनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 05:16 PM2024-11-18T17:16:25+5:302024-11-18T17:17:31+5:30

'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटावर नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Amit Shah Praises Vikrant Massey The Sabarmati Report | Pm Narendra Modi | Ekta Kapoor | 'सत्य कायमचे अंधारात...', PM नरेंद्र मोदींनंतर अमित शाह यांनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

'सत्य कायमचे अंधारात...', PM नरेंद्र मोदींनंतर अमित शाह यांनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

Amit Shah On The Sabarmati Report :  अभिनेता विक्रांत मेसीचा 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट गुजरातमध्ये २००२ साली गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर बेतलेला आहे. नुकतंच या चित्रपटाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं होतं. आता नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अमित शाह यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गृहमंत्र्यांनी लिहिले की, "शक्तिशाली प्रणालीने कितीही प्रयत्न केले तरी हे सत्य कायमचे अंधारात लपून ठेवू शकत नाही. 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट अतुलनीय धैर्याने अशा प्रणालीला नाकारतो आणि भयंकर घटनेमागील सत्य सर्वांसमोर उघड करतो". अमित शाह यांच्या ट्विटरवरील पोस्टचा स्क्रीनशॉट चित्रपटाची निर्माती एकता कपूर हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. "तुमच्या प्रेमळ शब्दांसाठी आणि कौतुकासाठी मनापासून धन्यवाद", या शब्दात तिने गृहमंत्र्यांचे आभार मानले.


अमित शाह यांच्याआधी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून आलोक भट्ट नावाच्या युजरची एक्स पोस्ट शेअर केली होती. गोध्रा घटनेवर बनवलेल्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाचा ट्रेलरही या पोस्टसोबत जोडण्यात आला होता. रिपोस्ट करताना पीएम मोदींनी लिहिले की, "सत्य समोर येत आहे, ही चांगली गोष्टी आहे. सामान्य लोकही ते पाहू शकतील. बनावट गोष्टी काही काळासाठी दाखवता येतात, पण तथ्ये नेहमीच बाहेर येतात", असे पीएम मोदी म्हणाले होते. 

दरम्यान, गोध्रा प्रकरणात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर बरीच टीका झाली होती. गुजरातमधील गोध्रा येथे अयोध्येहून साबरमती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या कारसेवकांच्या बोगीला आग लागली. या हृदयद्रावक घटनेत 59 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याच्या एका दिवसानंतर, 28 फेब्रुवारीपासून गुजरातमध्ये भीषण जातीय दंगली घडल्या, ज्यात सुमारे 1000 लोकांना आपला जीव गमवावा लागला. गोध्रा घटनेच्या वेळी पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

Web Title: Amit Shah Praises Vikrant Massey The Sabarmati Report | Pm Narendra Modi | Ekta Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.