PICS: अमिताभ बच्चन आजही खरेदी करू शकले नाहीत वडीलांच्या स्वप्नातील ‘हे’ घर, काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 12:59 PM2020-12-08T12:59:29+5:302020-12-08T13:00:48+5:30
वडिलांची आठवण म्हणून अमिताभ यांनी हा बंगला खरेदी करण्यासाठी नाही नाही ते प्रयत्न केलेत पण त्यांना यश आले नाही.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. जगभरात त्यांचे चाहते आहेत. अमिताभ यांच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत आणि त्या सर्वांना पार करत त्यांनी यशाचे शिखर गाठले. मात्र त्यांचे एक स्वप्न आजही अपूर्ण आहे. म्हणायला अमिताभ यांचे मुंबईत तीन तीन अलिशान बंगले आहेत. पण वडिलांच्या स्वप्नातील घर मात्र ते आजही खरेदी करू शकले नाहीत. अमिताभ यांनी हे घर खरेदी करण्याचे अनेक प्रयत्न केलेत पण हे घर खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न अद्यापही पूर्ण झालेले नाही.
हे घर आहे अलाहाबादेत. अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन अलाहाबादेतील याच घरात कधीकाळी भाड्याने राहत. 1984 मध्ये बिग बींनी सर्वप्रथम हे घर खरेदी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र ट्रस्टची संपत्ती असल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
1939 साली हरिवंशराय कटघर भागातील घर सोडून क्वाइव मार्गावरील या घरात भाड्याने राहायला गेले होते. हे घर म्हणजे एक प्रशस्त बंगला होता. या बंगल्यात तीन प्रशस्त खोल्या आहेत. या बंगल्याला 10 एन्ट्री गेट आहेत. यामुळे याला 10 द्वारांचा बंगला म्हणूनही ओळखले जाते. या बंगल्याच्या काही खोल्यांमध्ये कधीकाळी हरिवंशराय व तेजी बच्चन राहायच्या. पुढे हरिवंशराय दिल्लीला शिफ्ट झालेत. पण या बंगल्यातील आठवणी ते कधीही विसरू शकले नाहीत.
वडिलांची आठवण म्हणून अमिताभ यांनी हा बंगला खरेदी करण्यासाठी नाही नाही ते प्रयत्न केलेत पण त्यांना यश आले नाही. एकदा अमिताभ यांनी सोशल मीडियावर या बंगल्याचे फोटो शेअर केले होते. ‘एकेकाळी आम्ही या बंगल्याच्या एक चतुर्थांश भागात राहायचो. अलाहाबाइ 17 क्लाइव रोडवरचे हे आमचे घर,’ असे या घराचे फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले होते.
मीडिया रिपोर्टनुसार, इटावाचे नामवंत वकील शंकर तिवारी हे बंगल्याचे मालक होते. शंकर तिवारी आज हयात नाहीत. या बंगल्यात आता कोणीही राहत नाही. याची देखरेख ट्रस्टचे सदस्य व वकील के. के. पांडे करतात. पांडे तिवारींचे शेजारी होते.