‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये आले अमिताभ बच्चन व मान्यता दत्तचे नाव! वाचा काय आहे प्रकरण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 09:53 AM2017-11-06T09:53:15+5:302017-11-06T15:53:01+5:30
‘पॅराडाईज पेपर्स’मधील खुलाशांनी जगभर खळबळ माजली असताना आता यात अनेक सिनेकलावंतांचे नावही समोर आले आहे. ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये बोगस कंपन्यांचा ...
‘ ॅराडाईज पेपर्स’मधील खुलाशांनी जगभर खळबळ माजली असताना आता यात अनेक सिनेकलावंतांचे नावही समोर आले आहे. ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये बोगस कंपन्यांचा खुलासा करण्यात आला असून या कंपन्यांचा वापर जगातील श्रीमंत मंडळी परदेशात पैसे पाठवण्यासाठी करत होती. ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये भारतातील ७१४ जणांचा समावेश आहे. यातील दोन नावे जाणून तुमच्याही भुवया उंचावतील. होय, ही दोन नावे कोणती तर अमिताभ बच्चन आणि मान्यता दत्त यांची. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार,‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये अमिताभ व संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्या नावांचा समावेश आहे. बोगस कंपन्यांसाठी मान्यताच्या मान्यता या नावाऐवजी दिलनशी या नावाचा वापर करण्यात आला आहे. दिलनशी हे मान्यताचे आधीचे नाव आहे. संजय दत्तसोबत लग्न केल्यानंतर तिने दिलनशी हे नाव बदलवून मान्यता असे नवे नामकरण केले होते. मान्यता सध्या संजय दत्त प्रॉडक्शन प्राय. लिमिटेडच्या बोर्डाची मुख्य सदस्य आहे. याशिवाय द (Diqssh)एनर्जी, स्पार्कमॅटिक्स एनर्जी प्रा. लिमिटेड, दिक्सश रिअॅलिटी प्रा. लिमिटेड, दीक्षस इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड,सेवंटी एमएम मुव्हीज प्रा. लिमिटेड. ब्रिक बाय ब्रिक रिअॅल्यटर्स प्राय. लिमिटेड, टान्सपरन्सी एंटरटेनमेंट प्राय. लिमिटेड आदी कंपन्यांच्या पदांवर आहे. या कंपन्यांमध्ये २०१० मध्ये मान्यताच्या नावे ५००० डॉलरची संपत्ती असल्याचे म्हटले होते. ‘पॅराडाईज पेपर्स’मध्ये नाव आल्यानंतर मान्यताच्या प्रवक्त्याने खुलासा केला आहे. १९६१ च्या नियमांनुसार, सर्व संपत्ती कंपन्या, बॉडी कार्पोरेट व कंपनीचे शेअर्स बॅलेन्स शीटमध्ये जाहिर करण्यात आले होते, असे यात म्हटले आहे.
ALSO READ: मला कुठलीही प्रसिद्धी नकोय, शांती हवीय! अमिताभ बच्चन यांची मीडियाला विनंती!!
अमिताभ बच्चन यांचे बम्यूर्डामधील एका कंपनीत समभाग असल्याचा धक्कादायक खुलासाही झाला आहे. कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाºया बम्युर्डामधील ‘अॅपलबाय’ या कायदेशीर सेवा पुरवणा-या कंपनीची १३. ४ दशलक्ष कागदपत्रे उघड करण्यात आली आहे. बम्युर्डामधील अॅपलबाय आणि सिंगापूरमधील एशियासिटी या कंपन्यांनी १९ ठिकाणांवरुन स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा फिरवल्याचा गौप्यस्फोट ‘पॅराडाईज पेपर्स’मधून करण्यात आला आहे. याद्वारे जगभरातील राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंतांनी आपली मालमत्ता लपवली आणि कर चुकवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. ७१४ भारतीयांचा या यादीत समावेश असून ‘पॅराडाईज पेपर्स’मधील १८० देशांच्या यादीत भारत १९ व्या स्थानी आहे.