अनेक वर्षानंतर 'मे-डे'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार अजय देवगण- अमिताभ बच्चन, शूटिंगचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 01:01 PM2021-02-08T13:01:42+5:302021-02-08T13:26:23+5:30

डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

Amitabh bachchan and ajay devgan were seen shooting for the new film | अनेक वर्षानंतर 'मे-डे'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार अजय देवगण- अमिताभ बच्चन, शूटिंगचे फोटो व्हायरल

अनेक वर्षानंतर 'मे-डे'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार अजय देवगण- अमिताभ बच्चन, शूटिंगचे फोटो व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अजय देवगणने पुन्हा एकदा त्याच्या नव्या प्रोजेक्टवर काम  सुरू केलाृे आहे. अजय देवगणच्या या नव्या सिनेमाचे नाव 'मे- डे' आहे. सिनेमाच्या निर्मात्यांकडून 'मे-डे'बाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. या सिनेमाच्या एका महत्त्वाच्या भागाचे शूटिंग हैदराबादमध्ये करण्यात आले. या सिनेमात अजय देवगण आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करताना  दिसणार आहेत. यापूर्वी 'सत्याग्रह'मध्ये दोन्ही स्टार एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले होते. दीर्घकाळानंतर दोघे एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी केलं मुंबईत शूटिंग 
अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग केले आहे. यावेळी सेटवर कोविड संसर्ग रोखण्यासाठी बरीच खबरदारी घेतली गेली. कोविड प्रोटोकॉल सेटवर काटेकोरपणे पाळला गेला. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा एप्रिल 2021 मध्ये थिएटरमध्ये रिलीज होऊ शकतो.


अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग सिनेमात पायलटच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर अंगिरा धर वकील म्हणून दिसणार आहे. आकांक्षा सिंग यात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. आकांक्षाचा हा दुसरा हिंदी चित्रपट आहे. वरुण धवन आणि आलिया भटच्या 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटांमधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 2017 मध्ये आकांक्षाने 'मल्ली राव' सिनेमाव्दारे तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले.
 

Web Title: Amitabh bachchan and ajay devgan were seen shooting for the new film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.