अमिताभ यांचे पाय धरुन करीना मागत होती वडिलांसाठी दयेची भीक; 'पुकार'च्या सेटवर घडला होता मोठा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 11:37 AM2024-06-26T11:37:00+5:302024-06-26T11:37:31+5:30

Kareena kapoor: करीना सेटवर सगळ्यांसमोर मोठमोठ्या रडत होती. या गडबडीत ती जोरात पडली सुद्धा ज्यामुळे तिच्या पायाला दुखापत झाली होती.

amitabh-bachchan-beating-randhir-kapoor-of-shooting-film-pukar-kareena-kapoor-cried-know-incident | अमिताभ यांचे पाय धरुन करीना मागत होती वडिलांसाठी दयेची भीक; 'पुकार'च्या सेटवर घडला होता मोठा किस्सा

अमिताभ यांचे पाय धरुन करीना मागत होती वडिलांसाठी दयेची भीक; 'पुकार'च्या सेटवर घडला होता मोठा किस्सा

अमिताभ बच्चन या नावाचं इंडस्ट्रीत मोठं प्रस्थ आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते इंडस्ट्रीत सक्रीय आहे. विशेष म्हणजे वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही ते आजही सिनेमांमध्ये झळकतात. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही त्यांचा चांगला वावर आहे. त्यामुळे बऱ्याचदा ते त्यांच्या जुन्या सिनेमातील फोटो वा किस्से चाहत्यांसोबत शेअर करतात. यात अलिकडेच त्यांनी त्यांच्या एका सिनेमातील जुना किस्सा सांगितला. हा किस्सा अभिनेत्री करीना कपूर-खान हिच्याशी निगडीत आहे.

अमिताभ बच्चन यांचा पुकार हा सिनेमा अनेकांच्या लक्षात असेल. या सिनेमात अभिनेता रणधीर कपूर यांनीही स्क्रीन शेअर केली होती. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्यासोबत करीना सिनेमाच्या सेटवर जायची. परंतु एकदा या सेटवर अशी घटना घडली ज्यामुळे ती चक्क अमिताभ बच्चन यांच्या हातापाया पडली होती.

1983 मध्ये रिलीज झालेल्या पुकार या सिनेमाचं गोव्यात चित्रीकरण सुरु होतं. यावेळी सिनेमातील एक फायटिंग सीनचं चित्रीकरण सुरु होतं. या सीनमध्ये अमिताभ बच्चन रणधीर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते असं दृश्य होतं.  परंतु, आपल्या वडिलांना इतकं वाईट पद्धतीने अमिताभ बच्चन मारत असल्याचं पाहून करीना हवालदिल झाली आणि अमिताभ यांचे पाय धरुन रडू लागली. इतकंच नाही तर माझ्या वडिलांना मारु नका, अशी दयेची याचनाही ती करायला लागली.

वडिलांना मारत असल्याचं पाहून गडबडून गेलेली करीना सेटवरच पडली. त्यामुळे मग बिग बींनी तिला कडेवर उचललं आणि तिला शांत केलं. त्यानंतर तिच्या जखमेवर त्यांनी औषधही लावून दिलं. अमिताभ बच्चन यांनी हा किस्सा २०१९ मध्ये त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितला होता.

ओळखा पाहू ही मुलगी कोण आहे? गोव्यात पुकार सिनेमाच्या सेटवर करीना कपूर आहे ही. वडील रणधीर कपूर यांच्यासोबत आलेली. तिच्या पायाला दुखापत झाली आणि मी तिच्या पायाला औषध लावून दिलं होतं, असं म्हणत त्यांनी हा सेटवरचा फोटो शेअर केला होता.

दरम्यान, करीना आणि अमिताभ यांनीही अनेक सिनेमात एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. 'कभी खुशी कभी गम', 'देव' आणि 'सत्याग्रह' यांसारख्या सिनेमात ते एकत्र झळकले आहेत.
 

Web Title: amitabh-bachchan-beating-randhir-kapoor-of-shooting-film-pukar-kareena-kapoor-cried-know-incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.