अमिताभ बच्चन साकारणार भीष्म पितामह ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2017 10:01 AM2017-03-29T10:01:05+5:302017-03-29T15:31:05+5:30

 प्रसिद्ध एड फिल्ममेकर एऩए श्रीकुमार मेनन महाभारतावर आधारित एक बहुभाषी चित्रपट 'Randamoozham' दिग्दर्शित करत आहेत. जी ज्ञानपीठ विजेते लेखक ...

Amitabh Bachchan to become Bhishma Pitamah? | अमिताभ बच्चन साकारणार भीष्म पितामह ?

अमिताभ बच्चन साकारणार भीष्म पितामह ?

googlenewsNext
 
्रसिद्ध एड फिल्ममेकर एऩए श्रीकुमार मेनन महाभारतावर आधारित एक बहुभाषी चित्रपट 'Randamoozham' दिग्दर्शित करत आहेत. जी ज्ञानपीठ विजेते लेखक एमटी वासुदेवन नायर यांच्या कादंबरीवर आधारित आहे. महाभारताला आपण आतापर्यंत कृष्ण आणि पांडव यांच्या दृष्टीकोनातून बघितले आहेत पण पहिल्यांदा महाभारताला भीष्म पितामह यांच्या नजरेतून दाखवले जाणार आहे. मेनन यांनी  या भूमिके संदर्भात अमिताभ बच्चन यांना विचारल्याचे कळते आहे. दिग्दर्शकला या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांच्याशिवाय कोणतीच व्यक्ती या योग्य वाटत नाही आहे. 

या महत्त्वकांक्षी चित्रपटातल्या भीमच्या रोल मल्याळम अभिनेता मोहनलाल साकारणार आहेत. चित्रपटात वेगवेगळ्या भाषेतल्या कलाकारांची निवड करण्यात आली आहे. 'Randamoozham' 1984 मध्ये लिहिण्यात आले होते. ज्यात भीष्म पितामह यांच्या नजरेतून महाभारताकडे बघण्यात आले आहे. 

700-800 कोटींचा बजेट असलेला हा चित्रपट दोन भागांमध्ये तयार करण्यात येणार आहे. हिंदी, मल्याळम, तमिळ, तेलगु आणि इंग्रजी भाषेत हा चित्रपट तयार करण्यात येईल. 2018च्या शेवटी या चित्रपटाचे शूटिंग सुरु होईल आणि 2020मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. 2012मध्ये आलेल्या एनीमेटेड महाभारत चित्रपटाला भीष्म पितामह यांच्या पात्राला अमिताभ बच्चन यांनीच आवाज दिला होता. 

Web Title: Amitabh Bachchan to become Bhishma Pitamah?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.