करोडपती अमिताभ बच्चन! ३५० कोटींची कमाई; टॅक्सची रक्कम वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 09:51 IST2025-03-18T09:50:24+5:302025-03-18T09:51:19+5:30
अमिताभ बच्चन यांनी कमाई आणि आयकर भरण्याबाबतीत इतर सर्व सुपरस्टार्सना मागे टाकलं आहे.

करोडपती अमिताभ बच्चन! ३५० कोटींची कमाई; टॅक्सची रक्कम वाचून बसेल धक्का
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) गेल्या कित्येक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहेत. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांचा कामाचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा आहे. सिनेमा, जाहिराती आणि केबीसी शोमधून त्यांची करोडोंची कमाई होत असते. शिवाय त्यांची अनेक प्रॉपर्टीतही गुंतवणूक आहे. करोडो कमावणाऱ्या बिग बींनी यावर्षी तेवढाच भक्कम टॅक्सही भरला आहे. यावर्षी त्यांची तब्बल ३५० कोटींची कमाई झाली असून त्यांच्या टॅक्सही रक्कम वाचून थक्कच व्हाल.
अमिताभ बच्चन यांनी कमाईच्या बाबतीत इतर सर्व सुपरस्टार्सना मागे टाकलं आहे. २०२४-२५ या वर्षात ते सर्वात जास्त आयकर भरणारे सेलिब्रिटी आहेत. चित्रपट, ब्रँड एन्डॉर्समेंट्स आणि कौन बनेगी करोडपती शोमुळे त्यांची करोडोंची कमाई झाली. केबीसी शो तर ते गेल्या दोन दशकांपासून होस्ट करत आहे. २०२४-२५ मध्ये बिग बींनी तब्बल ३५० कोटी कमावले आहेत. यावर त्यांना १२० कोटी टॅक्स भरावा लागला आहे. गेल्या वर्षी त्यांनी ७१ कोटी रुपये टॅक्स भरला होता जो यावर्षी ६९ टक्क्यांनी वाढला आहे.
अमिताभ बच्चन यांना या वयातही अनेक प्रोजेक्ट्सच्या ऑफर येतात. एकेकाळी कर्जात बुडालेले बिग बी केबीसी शोमुळे वर आले आणि आजतागायत ते इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत. त्यांच्या या करोडोंच्या कमाईतून हा अंदाज येतोच. गेल्या वर्षी शाहरुख खान सर्वात जास्त टॅक्स भरणारा सेलिब्रिटी होता. त्याने तब्बल ९२ कोटी आयकर भरला होता. यावर्षी बिग बींनी त्याला पछाडलं आहे. यानंतर साऊथ सुपरस्टार थलपति विजय ८० कोटी आणि सलमान खान ७५ कोटी आयकर भरत या यादीत सामील आहे.