म्हणून वर्षातून दोनदा वाढदिवस साजरा करतात बिग बी, जाणून घ्या यामागचा रंजक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 09:33 AM2023-10-11T09:33:54+5:302023-10-11T10:41:11+5:30

१९७३ मध्ये प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला होता. या चित्रपटानंतर त्यांना भरघोस यश मिळालं.

Amitabh bachchan birthday known unknown fact about big b ganapath actor career and real life story | म्हणून वर्षातून दोनदा वाढदिवस साजरा करतात बिग बी, जाणून घ्या यामागचा रंजक किस्सा

म्हणून वर्षातून दोनदा वाढदिवस साजरा करतात बिग बी, जाणून घ्या यामागचा रंजक किस्सा

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज ८१वा वाढदिवस आहे. अमिताभ बच्चन हे सध्या 'कौन बनेगा करोडपती' हा टीव्ही शो देखील होस्ट करत आहेत.. अमिताभ यांना त्यांच्या कारकिर्दीत दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार यासह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये 'मेगा स्टार' आणि 'बिग बी' म्हणूनही ओळखलं जातं. जवळपास दोन दशकं त्यांनी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.

उल्लेखनीय म्हणजे त्यांचा पहिला चित्रपट 'सात हिंदुस्तानी' होता, जो १९६९ मध्ये प्रदर्शित झाला. १९७३ मध्ये प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'जंजीर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला होता. या चित्रपटानंतर त्यांना भरघोस यश मिळालं. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधीत काही किस्सा. 

अमिताभ वर्षातून दोनदा त्यांचा वाढदिवस साजरा करतात, यामागे एक खास कारण आहे. ११ ऑक्टोबर आणि  २ ऑगस्टला आपला वाढदिवस सेलिब्रेट करतात. 1982 साली त्यांचा दुसरा जन्म झाला. 26 जुलै 1982 मध्ये ‘कुली’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी अमिताभ बच्चन व पुनीत इस्सर यांच्यात एक फाईट सीन शूट करताना बिग बी यांचा पोटात गंभीर दुखापत झाली होती. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांचे बरेच रक्त वाहून गेले होते. अमिताभ यांना गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता.  अमिताभ मृत्यूशी झुंज देत होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत  अमिताभ धोक्याबाहेर असल्याचे जाहिर केले होते. ती तारीख होती 2 ऑगस्ट. कुली अपघातानंतर 2 ऑगस्टला अमिताभ यांना जीवदान मिळाले होते. हा त्यांचा दुसरा जन्म होता.  त्यामुळे अमिताभ 2 ऑगस्टला आपला दुसरा वाढदिवस साजरा करतात. 

 
 

Web Title: Amitabh bachchan birthday known unknown fact about big b ganapath actor career and real life story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.