'आमचं घर एक मिनी इंडियासारखं'; ‘केबीसी १५’च्या मंचावर कुटुंबाबद्दल काय म्हणाले बिग बी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 07:23 PM2023-10-25T19:23:41+5:302023-10-25T19:39:23+5:30

'कौन बनेगा करोडपती 15'  हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून बिग बी हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. 

Amitabh Bachchan calls his family mini India on KBC | 'आमचं घर एक मिनी इंडियासारखं'; ‘केबीसी १५’च्या मंचावर कुटुंबाबद्दल काय म्हणाले बिग बी?

'आमचं घर एक मिनी इंडियासारखं'; ‘केबीसी १५’च्या मंचावर बिग बींचा कुटुंबाबद्दल खुलासा

बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात जुन्या कुटुंबांपैकी एक आहे. या कुटुंबातील जवळपास प्रत्येकजण चित्रपटसृष्टीशी जोडला आहे. बच्चन कुटुंबाला अनेकदा एकत्र पाहिले जातं. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी बच्चन कुटुंबात छोटं भारत असल्याचं केबीसीच्या एका एपिसोडमध्ये  म्हटलं.  'कौन बनेगा करोडपती 15'  हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून बिग बी हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. 

रोलओवर कंटेस्टेंट चमत्कारी चट्टोपाध्याय ताज्या एपिसोडमध्ये त्यांच्या कुटुंबातील बायको-सुनेच्या भांडणाबाबत बोलत असतात. तेव्हा ते अमिताभ यांना विचारतात की तुमच्या घरातही असं होतं का? तर उत्तरात अमिताभ म्हणतात, 'मी समजू शकतो, घरातील सर्वांमध्ये मीच फसतो.  पण, मला जे आवडतं ते म्हणजे माझं कुटुंब खूप वैविध्यपूर्ण आहे. माझ्या मुलीचे लग्न पंजाबी कुटुंबात झालं आहे आणि माझ्या मुलाचं लग्न दक्षिणेत झालं आहे. माझ्या घरात देशाच्या विविध भागातील लोक आहेत. आमचं घर मिनी इंडियासारख आहे आणि आम्हाला ते फार आवडतं.

अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकने अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत लग्न केले आहे. श्वेता बच्चनने निखिल नंदासोबत लग्न केले आहे. अमिताभ बच्चन हे त्यांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहेत. सोशल मीडियावरही ते अनेकदा फोटो शेअर करत असतात. अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ते अलिकडेच प्रदर्शित झालेल्या गणपत चित्रपटात दिसले. याआधी त्यांनी घूमर या चित्रपटात कॅमिओ केला होता. याशिवाय, अमिताभ हे रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'थलाइवर 170' मध्येही पाहायला मिळणार आहेत. 

Web Title: Amitabh Bachchan calls his family mini India on KBC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.