बिग बींना डिस्चार्ज मिळाला; हृदयाची अँजिओप्लास्टी नव्हे तर 'या' कारणाने रुग्णालयात होते दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 06:12 PM2024-03-15T18:12:38+5:302024-03-15T18:14:29+5:30
अमिताभ यांच्या हृदयाची अँजिओप्लास्टी झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. पण अमिताभ यांना रुग्णालयात दाखल करण्याचं खरं कारण समोर आलंय
अमिताभ बच्चन यांच्याविषयी नुकतीच एक मोठी बातमी समोर आली. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला. पण आनंदाची बातमी म्हणजे.. अमिताभ यांना रुग्णालयातून डिस्चार्ज सुद्धा मिळाला आहे. अमिताभ यांच्या हृदयाची अचानक अँजिओप्लास्टी झाल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. अमिताभ यांची अँजिप्लास्टीचं खरंच झाली का? याविषयी मोठी माहिती समोर आलीय. काय होतं अमिताभ यांच्या रुग्णालयात दाखल होण्यामागचं खरं कारण?
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वास्तविक.. अमिताभ यांच्या पायात रक्ताची गाठ निर्माण झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आणि अँजिओप्लास्टी करण्यात आली. पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्याने पायाची अँजिओप्लास्टी करण्यात येते. त्यामुळे अमिताभ यांच्या हृदयाची नव्हे तर पायाची अँजिओप्लास्टी करण्यात आली. शुक्रवारी सकाळी त्यांना कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आता व्यवस्थित उपचार घेऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Minor surgery was performed on the leg Media star Amitabh Bachchan to remove a clot blocking his artery this morning. Surgical procedure was performed at Kokilaben Ambani Hospital in Mumbai. News about Angioplasty, often related to the heart was flashed in the media. As compared… pic.twitter.com/n4aRUUB7w0
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) March 15, 2024
अमिताभ यांना घरी सोडण्यात आलं असून ते काही दिवस विश्रांती घेणार आहेत. रिकव्हरी झाल्यावर ते पुन्हा एकदा शुटींगला सुरुवात करतील. अमिताभ सध्या रजनीकांतसोबत आगामी 'थलैवर 170' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहेत. याशिवाय अमिताभ आणि प्रभास यांच्या आगामी 'कल्की' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. या सिनेमात कमल हासन, दीपिका पादुकोण हे कलाकार सुद्धा झळकणार आहेत.