अमिताभ बच्चन यांना अजिबात आवडत नाहीत मोमोज; कारण ऐकून व्हाल थक्क!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 03:35 PM2023-11-12T15:35:12+5:302023-11-12T15:36:55+5:30
महानायक अमिताभ बच्चन यांना मोमोज आजिबात आवडत नाहीत.
अनेकांना मोमोज खायला आवडते. भाज्या आणि चिकनने भरलेल्या पदार्थाचे लोकांना वेड लागले आहे. मोमोजच्या अप्रतिम चवीचा विचार करूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत. पण, महानायक अमिताभ बच्चन यांना मोमोज आजिबात आवडत नाहीत.
'कौन बनेगा करोडपती 15' मध्ये दिवाळीचा एक विशेष भागही दाखवण्यात येत आहे. या एपिसोडच्या रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हे वसुबारसवर बोलताना पाहायला मिळाले. अमिताभ म्हणतात, 'भारतीय परंपरेत गायीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे वसुबारससारखा सण गाईचा मान वाढवतो. त्यांना आदरणीय बनवते आणि त्यांच्या संवर्धनास प्रोत्साहन देते'.
'कौन बनेगा करोडपती 15'मध्ये पुण्याची वैशाली कृष्णा हॉट सीटवर बसलेली पाहायला मिळते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी वैशालीसमोर एक हजार रुपयांचा प्रश्न ठेवला. त्यात तिला विचारले की यातील कोणते चित्र मोमोजसारखे दिसते? या प्रश्नानंतर अमिताभ सांगतात की त्यांना मोमोज अजिबात आवडत नाहीत. ते म्हणाले, 'दिसायला ते खूप विचित्र आहे. तोंडात काय जाते ते कळत नाही. आपल्या तोंडात लाडू जिलेबी जायला पाहिजे. या मोमोजत तर नावच भयंकर आहे'.
अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास ते अलिकडेच प्रदर्शित झालेल्या गणपत चित्रपटात दिसले. याआधी त्यांनी घूमर या चित्रपटात कॅमिओ केला होता. याशिवाय, अमिताभ हे रजनीकांत यांचा आगामी सिनेमा 'थलाइवर 170' मध्येही पाहायला मिळणार आहेत.