‘या’ अभिनेत्रीमुळे अमिताभ बच्चनचे मर्सिडीजमध्ये बसण्याचे स्वप्न झाले पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 11:28 AM2017-11-04T11:28:14+5:302017-11-04T16:58:14+5:30
अभिनेत्री मुमताज १९७३ पर्यंत इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. त्याचदरम्यान, बॉलिवूडचे महानायक त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड ...
अ िनेत्री मुमताज १९७३ पर्यंत इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. त्याचदरम्यान, बॉलिवूडचे महानायक त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करीत होते. खरं तर अमिताभ आणि मुमताज यांनी जास्त चित्रपटांमध्ये काम केले नाही. परंतु एकदा मुमताजने अमिताभ यांच्याकरिता असे काही केले होते, ज्याची प्रशंसा करताना आजही अमिताभ थकत नाहीत. त्याचे झाले असे की, १९७३ मध्ये अमिताभ आणि मुमताज ‘बंधे हाथ’ या चित्रपटाची शूटिंग करीत होते. मुमताज त्यावेळी सेटवर तिच्या मर्सिडीज कारने येत असे. तर अमिताभ एका साधारण कारने सेटवर यायचे.
अमिताभ यांनी एका मुलाखतीदरम्यान याबाबतचा उल्लेख करताना म्हटले होते की, मुमताजसोबतचा ‘बंधे हाथ’ हा चित्रपट त्यावेळी फारसा यशस्वी झाला नव्हता. मात्र मुमताज यांनी त्यावेळी एक स्टारडम मिळविला होता. त्याकाळी तिची गणना टॉपच्या अभिनेत्रींमध्ये केली जात होती. मात्र एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्या सहकलाकारासोबत मित्रत्वाच्या भावनेने वागत होती. ज्यामुळे शूटिंगचे वातावरण खूपच हेल्दी राहायचे. एक दिवस ती तिच्या मित्रांसोबत मर्सिडीज कारविषयी बोलत होती.
मात्र त्याचदरम्यान अमिताभ बोलले की, जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मीदेखील मुमताजप्रमाणेच मर्सिडीजमध्ये फिरणार. बिग बीचे हे वाक्य मुमताजने ऐकले. मग काय, तिने तिच्या मर्सिडीजच्या कारची चावी अमिताभ यांच्या ड्रायव्हरकडे दिली आणि अमिताभच्या कारने निघून गेली. यावेळी मुमताजने ड्रायव्हरला सांगितले की, ‘अमिताभला सांग की, जोपर्यंत तुझे मन भरत नाही तोपर्यंत या कारचा तू वापर करू शकतोस.’ मुमताजच्या या दिलदारपणामुळे मर्सिडीजमध्ये बसण्याची अमिताभ यांची इच्छा पूर्ण झाली.