'मी माजी खासदार असल्याने..'; नव्या संसद भवनाच्या इमारतीविषयी बिग बींचं वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 03:43 PM2023-05-28T15:43:17+5:302023-05-28T15:44:23+5:30
Amitabh bachchan: नवीन संसद भवनाची आतील रचना कशी असेल हे जाणून घेण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक उत्सुक आहे. हीच उत्सुकता बिग बींच्या बाबतीतही पाहायला मिळाली.
भारताच्या नव्या संसद भवनाचं आज ( 28 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून या नव्या संसदभवनाची चर्चा रंगली होती. अखेर मोठ्या थाटात हा उद्धाटन सोहळा पार पडला. या उद्घाटनानंतर कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी याविषयी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यामध्येच अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माद्यमातून संसदभवनाच्या रचनेबद्दल भाष्य केलं आहे.
नवीन संसद भवनाची आतील रचना कशी असेल हे जाणून घेण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक उत्सुक आहे. हीच उत्सुकता बिग बींच्या बाबतीतही पाहायला मिळाली. ही उत्सुकता व्यक्त करत त्यांनी नव्या संसद भवनाचं कौतुक केलं.
काय म्हणाले बिग बी?
आता देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. मी माजी खासदार असल्याने या खासप्रसंगी माझ्या शुभेच्छा. मला या नवीन संसद भवनाच्या रचनेबद्दल जाणून घेण्याची कमालीची उत्सुकता आहे. त्याचा आकार, त्याची बांधणी कशी केली असेल हे मला जाणून घ्यायचंय. सोबतच या नव्या इमारतीचा पौराणिक, धर्मशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय अर्थ काय आहे हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे, असं बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, बिग बींसह कलाविश्वातील अनेक कलाकारांनी नव्या संसद भवनाच्या उद्धाटनासाठी शुभेच्छा दिल्या. यात शाहरुख खान, अक्षय़ कुमार, कमल हासन, रजनीकांत या कलाकारांचा समावेश आहे.