‘झुंड’चे शूटींग पूर्ण! नागपूरकरांचा निरोप घेताना भावूक झालेत अमिताभ बच्चन!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 12:22 PM2019-01-13T12:22:55+5:302019-01-13T12:24:53+5:30
‘झुंड’चे शूटींग सरले अन् नागपूरकरांचा निरोप घेताना अमिताभ काहीसे भावूक झालेले दिसले. आपल्या सोशल अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून नागपुरात होते. कारण अर्थातचं सगळ्यांनाच ठाऊक आहे. ‘सैराट’ फेम नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाचे शूटिंग नागपुरात सुरू होते. यादरम्यान अमिताभ यांनी नागपूरकरांचे प्रेम अनुभवले, तसाच नागपूरचा गारठाही अनुभवला. आपल्या सोशल अकाऊंटवर ‘झुंड’च्या सेटवरचे अनेक अपडेट्स अमिताभ यांनी शेअर केलेत. पण ‘झुंड’चे शूटींग सरले अन् नागपूरकरांचा निरोप घेताना अमिताभ काहीसे भावूक झालेले दिसले. आपल्या सोशल अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
T 3054 - As you end one and get set to leave .. the emotions and withdrawal symptoms begin to reflect .. thank you JHUND .. hello again BRAHMASTRA .. pic.twitter.com/ZsID7jUs8y
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 11, 2019
‘एखादी गोष्ट सुरू करुन जेव्हा सोडण्याची वेळ येते तेव्हा त्याबद्दलच्या भावना या वेगळ्याच असतात.... , असे अमिताभ यांनी लिहिले. सरतेशेवटी त्यांनी ‘झुंड’च्या अख्ख्या टीमचे आभारही त्यांनी मानले.
T 3052 -
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 8, 2019
बड़े दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा ; और बैल गाड़ी की सवारी का pic.twitter.com/GD6RcUxzuf
T 3052 - .. they asked me when was the last time you travelled by bus .. I said : 'this afternoon' .. ! but good to remember those College and job hunting days of bus and tram travel .. pic.twitter.com/sEcfgfPiHs— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 8, 2019
यापूर्वी अमिताभ यांनी गावाकडच्या आठवणींना उजाळा दिला होता. ‘झुंड’च्या निमित्ताने अनुभवायला मिळालेल्या बैलगाडीच्या प्रवासाचे, खाटेवरच्या झोपीचे काही क्षण त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केले होते. ‘बडे दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा और बैल गाडी की सवारी की...’, असे लिहित त्यांनी काही फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आता अमिताभ 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
अमिताभ यांचा हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.‘झुंड’ हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून प्रोड्यूस करत आहेत. हा नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या पहिल्या चित्रपटात महानायक अमिताभ दिसणार आहेत.