Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचं ‘शहेनशाह’मधील स्टील आर्म जॅकेट कुठे आहे माहितीये? बिग बींनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:25 AM2023-03-22T11:25:57+5:302023-03-22T11:26:40+5:30

Amitabh Bachchan Iconic Shahenshah Jacket : अमिताभ यांचा ‘शहेनशाह’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेल तर या चित्रपटात त्यांनी घातलेलं स्टील व साखळ्यांचं युनिक जॅकेटही तुम्हाला नक्कीच आठवत असणार.  हे जॅकेट आता  कुठे आहे, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाये?

Amitabh Bachchan Gifts His Iconic Shahenshah Jacket To His Friend In Saudi Arabia | Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचं ‘शहेनशाह’मधील स्टील आर्म जॅकेट कुठे आहे माहितीये? बिग बींनी केला खुलासा

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचं ‘शहेनशाह’मधील स्टील आर्म जॅकेट कुठे आहे माहितीये? बिग बींनी केला खुलासा

googlenewsNext

Amitabh Bachchan Iconic Shahenshah Jacket  : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चित्रपटांची चर्चा कायम होत असते. अलीकडे त्यांच्या शोले या सुपरडुपर हिट सिनेमाचे काही जुने फोटो व्हायरल झाले होते. आता अमिताभ यांच्या ‘शहेनशाह’ या चित्रपटाची चर्चा आहे. होय, १९८८ साली रिलीज झालेल्या या सिनेमाने चाहत्यांना वेड लावलं होतं. आजही या सिनेमातील अमिताभ यांच्या तोंडचे संवाद बिग बींच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ आहेत. अमिताभ यांचा हा सिनेमा तुम्हाला आठवत असेल तर या चित्रपटात त्यांनी घातलेलं स्टील व साखळ्यांचं युनिक जॅकेटही तुम्हाला नक्कीच आठवत असणार.  या खास जॅकेटची एक बाजू स्टीलच्या साखळ्यांची होती.  हे जॅकेट आता  कुठे आहे ? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाये? पडला असेल तर खुद्द अमिताभ बच्चन यांनी याबाबत  खुलासा केला आहे.

होय, अमिताभ यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘शहेनशाह’मधील त्या खास जॅकेटचा उल्लेख केला आहे. हे जॅकेट कुणाकडे आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. तर‘शहेनशाह’मध्ये अमिताभ यांनी घातलेलं ते जॅकेट आता तुर्की अल्लालशिख नावाच्या व्यक्तिकडे आहे. हा तुर्की अल्लालशिख कोण, त्याचा अमिताभ यांचा काय संबंध, असे प्रश्न तुम्हाला पडले असतीलच. तर हा तुर्की अमिताभ यांचा मित्र आहे. सौदी अरेबियाच्या या मित्राला अमिताभ यांनी आपलं स्टील आर्म जॅकेट  गिफ्ट म्हणून दिलं आहे.

तुर्की अल्लालशिखने ट्विटरवर अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशाह’ चित्रपटातील काही छायाचित्रे शेअर करत पोस्ट लिहिली होती, “जगातील सर्वोत्कृष्ट आणि दिग्गज अभिनेत्यांपैकी… तुम्ही केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी सन्मान आहात. तुम्ही मला पाठवलेल्या भेटवस्तूबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी ही भेट खूप अनमोल आहे,” असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

अमिताभ बच्चन यांनी त्याचं हे ट्विट रिट्वीट करत दिला प्रतिसाद दिला आहे. “माझा सर्वात प्रिय आणि सर्वात विचारशील मित्र... तुला स्टील आर्म जॅकेट भेट देणं खूप सन्मानाची गोष्ट आहे.. हे मी माझ्या ‘शहेनशाह’ चित्रपटात परिधान केले होतं. मी ते जॅकेट घालून कसं वावरतो, ते मी तुला कधीतरी नंतर सांगेन. माझ्याकडून खूप प्रेम,” असं अमिताभ यांनी लिहिलं.  

अमिताभ बच्चन यांचा शहेनशाह हा चित्रपट १९८८ साली प्रदर्शित झाला होता.  टिन्नू आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अमिताभ डबल रोलमध्ये होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी विजय कुमार श्रीवास्तवची भूमिका साकारली होती, जो रात्री अन्यायाविरुद्ध लढतो आणि दिवसा भ्रष्ट पोलिस इन्स्पेक्टर असतो. या चित्रपटात बिग बींसह मीनाक्षी शेषाद्री, प्राण, अरुणा इराणी, प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, कादर खान, अवतार गिल या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.  

Web Title: Amitabh Bachchan Gifts His Iconic Shahenshah Jacket To His Friend In Saudi Arabia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.