‘या’ फोटोमुळे अमिताभ बच्चन यांना मिळाला होता नकार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 07:16 AM2018-03-21T07:16:31+5:302018-03-21T12:46:31+5:30
महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय आहेत. तूर्तास अमिताभ यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेला एक फोटो वा-याच्या ...
म ानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय आहेत. तूर्तास अमिताभ यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेला एक फोटो वा-याच्या वेगाने व्हायरल होतोयं. हा फोटो दुस-या कुणाचा नसून स्वत: अमिताभ यांचाच आहे. तरूणपणीच्या या फोटोत अमिताभ यांनी पांढ-या रंगाचा कुर्ता-पायजामा घातलायं आणि एका झाडाला टेकून ते बसलेले दिसताहेत. साहजिकचं या फोटोमागे कहाणीही आहेचं. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये अमिताभ यांनी ही कहाणी सांगितली आहे. त्यानुसार, हा फोटो १९६८ आहे. ‘चित्रपटात काम मागण्यासाठी मी हाच फोटो पाठवला होता. आज १९६८ चा हा फोटो बघतो, तेव्हा मला माझ्या रिजेक्शनबद्दल जराही आश्चर्य वाटत नाही,’असे अमिताभ यांनी लिहिले आहे.
अमिताभ यांच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. ‘यशाच्या पहिल्या पायरीकडे कुणाचेच लक्ष जात नाही,’ असे एका युजरने लिहिलेयं. ‘महान व्यक्तींना आधी नकारचं पचावावा लागतो,’ असे एका दुस-या युजरने लिहिलेय. एका युजरने हा फोटो पाहून अमिताभ यांना ‘रिअल हिरो’ संबोधले आहे. १९६९ मध्ये ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी बॉलिवूड डेब्यू केला होता. पण त्याआधी त्यांना बरेच नकार पचवावे लागलेत. करिअरच्या सुरूवातीच्या दिवसात अमिताभ बच्चन यांनी आकाशवाणीमध्ये अनाऊंसर म्हणून नोकरीसाठी अर्ज केला होता. पण त्यांना त्यांच्या आवाजामुळे नकार देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी कोलकातामध्ये एका कंपनीत सुपरवायझर म्हणून नोकरी केली. तेव्हा त्यांना महिन्याला ८०० रुपये पगार होता.
ALSO READ : शेकडोंच्या गर्दीतून रस्ता काढत ‘जलसा’त शिरली चिमुकली चाहती! बिग बींनी शेअर केलेत फोटो!!
तूर्तास अमिताभ ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ आणि ‘१०२ नॉट आऊट’ या चित्रपटात बिझी आहेत. अलीकडे जोधपूर येथे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’च्या सेटवर अमिताभ यांची प्रकृती बिघडली होती. यानंतर मुंबईची डॉक्टरांची एक टीम जोधपूरला पोहोचली होती. डॉक्टरांचे उपचार आणि काही दिवस विश्रांती केल्यानंतर अमिताभ पुन्हा एकदा कामावर परतले आहेत.