अखेर अमिताभ बच्चन यांची नातीचं स्वप्न पूर्ण, नव्या नंदाची नवी इनिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 01:18 PM2024-09-02T13:18:32+5:302024-09-02T13:19:04+5:30

नव्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Amitabh Bachchan Grand Daughter Navya Naveli Nanda joins IIM Ahmedabad for BPGP MBA | अखेर अमिताभ बच्चन यांची नातीचं स्वप्न पूर्ण, नव्या नंदाची नवी इनिंग!

अखेर अमिताभ बच्चन यांची नातीचं स्वप्न पूर्ण, नव्या नंदाची नवी इनिंग!

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda)  इतर स्टारकिड्स पेक्षा कायमच वेगळी ठरते.  नव्या ही अभिनय क्षेत्राकडे वळली नसून तिने करिअरसाठी वेगळाच पर्याय निवडला आहे. नव्या नंदा तिच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिशेने तिने एक मोठे पाऊल टाकले आहे. नव्याला देशातील टॉपच्या असलेल्या भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबादमध्ये (Indian Institutes of Management) प्रवेश मिळाला आहे. 

नव्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहलं, 'स्वप्न पूर्ण होतात'. नव्या ही पुढील दोन वर्ष अर्थात 2026 पर्यंत भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबादमध्ये पुढचं शिक्षण पूर्ण करणार आहे. 'ब्लेंडेड पोस्ट ग्रेजुएशन प्रोग्राम' (BPGP MBA) असं कोर्सचं नाव असल्याचं तिनं सांगितलं आहे. 


नव्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती IIM च्या गेटवर उभी असल्याचं दिसून येत आहे. तर याशिवाय तिनं कॉलेजमधील काही फोटो शेअर करत कॅम्पसची एक झलक चाहत्यांना दाखवली आहे. यात नव्याच्या चेहऱ्यावर तिचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद दिसून येत आहे. तिच्या पोस्टवर चाहते आणि मित्रमैत्रीणीनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. 


नव्यानं सामाजिक सेवा, महिलांचे विषयांवर काम केलं आहे. तिचा साधेपणा आणि समाजसेवेसाठी ती घेत असलेला पुढाकार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. इतक्या कमी वयात श्वेताने स्वत: स्टार्टअप सुरु केलं आहे.  या माध्यमातून ती महिला सबलीकरण, शिक्षण या विषयांवर काम करते. नेटकरी कायम तिचं कौतुक करत असतात. 

Web Title: Amitabh Bachchan Grand Daughter Navya Naveli Nanda joins IIM Ahmedabad for BPGP MBA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.