बिग बींनी त्यांच्या बिघडलेल्या तब्येतीबाबत केला खुलासा, वाचून तुम्हाला वाटेल त्यांची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 12:10 IST2019-10-19T12:09:50+5:302019-10-19T12:10:18+5:30
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून चाहत्यांचे आभार मानले आहेत.

बिग बींनी त्यांच्या बिघडलेल्या तब्येतीबाबत केला खुलासा, वाचून तुम्हाला वाटेल त्यांची चिंता
बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन वयाच्या ७७व्या वर्षीदेखील सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. ते त्यांच्या फिटनेसची खूप काळजी घेतात. सत्तरी उलटली असतानादेखील ते फिट दिसतात. मात्र नुकतेच समजते आहे की अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली आहे. बॉलिवूडमधील कलाकारांसोबत त्यांचे चाहते खूप चिंतेत आहेत. आता ते बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून रजा देण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या तब्येतीबद्दल ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं की, माझे प्रिय व्यक्ती... सर्वांचे मी आभार मानतो...त्या सर्वांचे ज्यांना माझी काळजी वाटते. ज्यांना वाटतं की माझी काळजी घेतली पाहिजे. अमिताभ बच्चन यांच्या निधनाबाबतच्या अफवा बऱ्याचदा ऐकायला मिळाल्या आहेत. आतादेखील त्यांची तब्येत बिगडली तर अशाप्रकारच्या बातम्या सोशल मी़डियावर येऊ लागल्या होता. याबाबतही बिग बींनी नाराजी ब्लॉगमध्ये व्यक्त केली आहे.
बिग बींने लिहिले की, प्रोफेशनल डॉक्युमेंटेशनच्या विधी तोडू नका. तब्येत बिघडणे व मेडिकल कंडीशन हे खासगी अधितार आहेत. हे चुकीचं आहे आणि जर स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी याचा वापर केला जात असेल तर सामाजिकरित्या चुकीचं आहे. आदर ठेवा आणि याबद्दल चांगली समज ठेवा. जगात सगळ्याची विक्री होत नसते.
अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर कौन बनेगा करोडपतीच्या ११ व्या सीझनचे ते सूत्रसंचालन करत आहेत.
याशिवाय झुंड, बटरफ्लाय, एबी आणि सीडी, ब्रह्मास्त्र, चेहरे व गुलाबो सिताबो या चित्रपटात ते झळकणार आहेत.