'अनुष्का के पास विराट खोली है', Amitabh Bachchan यांच्या विनोदी पोस्टवर चाहते हसून हसून होतायेत लोटपोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 15:55 IST2021-04-04T15:50:46+5:302021-04-04T15:55:36+5:30
Amitabh Bachchan Hiilariously poked fun at Virushka अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्यावर एक विनोद शेअर केला आहे. एक फोटो शेअर करत त्यांनी मजेदार अशी कॅप्शन लिहीली आहे.

'अनुष्का के पास विराट खोली है', Amitabh Bachchan यांच्या विनोदी पोस्टवर चाहते हसून हसून होतायेत लोटपोट
हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांना वेळेचं महत्त्व चांगलंच माहिती आहे. या वयातही त्यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट असून कोणत्याही आजच्या कलाकारापेक्षा सगळ्यात बिझी बिग बी आहेत. मात्र शूटिंगमधून निवांत वेळ मिळताच बिग बी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोडी ते चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात.
सोशल मीडियावर ज्या गोष्टी त्यांना अधिक भावतात त्यावर ते कमेंट्स करत आपले मतंही मांडतांना दिसतात.अमिताभ यांनी आता थेट विरुष्कावरच एक कमेंट केली आहे. ही कमेंट वाचून सोशल मीडियावर मात्र चाहते हसून हसून लोटपोट होत आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्यावर एक विनोद शेअर केला आहे. एक फोटो शेअर करत त्यांनी मजेदार अशी कॅप्शन लिहीली आहे.
कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटलंय की, Anushka has a huge apartment ! पण हेच हिंदीमध्ये त्याचे भाषांतर केले तर- अनुष्का के पास विराट खोली है.' विराट आणि अनुष्कावरून अमिताभ बच्चन यांनी केलेला हा विनोद सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. युजर्सही अमिताभ यांनी केलेल्या विनोदाची मजा लुटताना दिसत आहेत.
आईच्या हाती चिमुकली वामिका अन् बाबाच्या हातात बॅग्स...! विरूष्काचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल
विमानतळावरील विरूष्काचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत अनुष्काच्या हातात वामिका आहे तर विराट सर्व बॅग्स सांभाळताना दिसतोय. इंग्लंड विरूद्धच्या टी-20 सीरिजसाठी विराट कोहली अहमदाबादला गेला होता. अनुष्का व वामिकाही त्याच्यासोबत होते. आता टीम इंडिया पुढच्या मॅचसाठी पुण्याला रवाना झाली आहे. यादरम्यान विरूष्काला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले.
चिमुकल्या वामिकाला अनुष्काने अगदी छातीशी कवटाळून घेतले आहे. साहजिकच मीडियापासून तिचा चेहरा लपवणे हा अनुष्काचा उद्देश आहे. कोणत्याही फोटोत वामिकाचा चेहरा येणार नाही, याची तिने पूरेपूर काळजी घेतली आहे. विराटच्या दोन्ही हातात मोठमोठ्या बॅग व बेबी स्ट्रालर आहे. विराट ज्या प्रकारे पित्याचे कर्तव्य बजावतोय, ते पाहून अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.