रेखा- अमिताभ बच्चनप्रमाणे यांचे प्रेम ही पडद्यापुरते राहिले मर्यादित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 07:24 AM2017-10-10T07:24:16+5:302017-10-14T16:11:29+5:30
बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची केमिस्ट्री रिल लाईफमध्ये हिट ठरली मात्र रिअल लाईफमध्ये ते एकत्र येऊ शकले नाहीत. ...
ब लिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची केमिस्ट्री रिल लाईफमध्ये हिट ठरली मात्र रिअल लाईफमध्ये ते एकत्र येऊ शकले नाहीत. ज्या जोड्यांचा प्रवास रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमाणे फक्त पडद्यावर पुरताच मार्यादित राहिला. खऱ्या आयुष्यात ते एकमेकांचे साथीदार बनू शकले नाहीत. अशाच काही जोड्यांवर टाकूया एक नजर..
रेखा- अमिताभ बच्चन
रेखा यांच्या नावाचा जेव्हा उल्लेख होता तेव्हा अमिताभ बच्चन हे नाव आपसुकच ओठांवर येते. रेखा आणि अमिताभ यांची जोडी सगळ्यात बी-टाऊनमधील चर्चेत जोडी होती. तो काळ या जोडीने खूप गाजवला होता. एक वेळ अशी ही आली कि रेखा अमिताभ यांच्याशिवाय तर अमिताभ रेखाशिवाय अधुरे होते. अमिताभ जयाला सोडून रेखा यांच्याशी लग्न करणार अशा बऱ्याच चर्चा देखील झाल्या. मात्र अमिताभ यांनी कधीच जया बच्चन यांची साथ सोडली नाही आणि रेखा एकट्या राहुन गेल्या. आज दोघे एकमेंकासमोर कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात आणि अॅवॉर्ड सोहळ्यात येणं टाळतात.
गुरुदत्त- वहीदा रहमान
वहीदा रहमान यांनी आपल्या करिअरची सुरुवात गुरुदत्त यांच्या चित्रपटातून एका नेगेटीव्ह भूमिकेतून केली होती. वहिदा यांच्या अभिनयावर आणि सौदर्यांवर भाळलेल्या गुरु दत्त यांनी पुढच्या अनेक चित्रपटांसाठी वहीदा यांना आपली साथीदार बनवले. एकत्र काम करता करता गुरुदत्त वहिदा यांच्या प्रेमात अखंड बुडाले. सगळ्यांनीच त्यांच्यातील प्रेमाला मोठ्या पडद्यावर अनुभवले. मात्र आपले प्रेम न मिळाल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेल्या गुरुदत्त यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.
राज कपूर- नर्गिस
राज कपूर आणि नर्गिस यांची प्रेमकाहाणी सगळ्यांच माहिती आहे. दोघांची केमिस्ट्री पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहांच्याबाहेर रिघ लागायची. दोघांची केमिस्ट्री चित्रपटामध्ये जेवढी हिट होती तेवढीच वैयक्तिक आयुष्यात ही होती. मात्र पृथ्वीराज कपूर यांना नर्गिस सून म्हणून कधीच पसंत नव्हती. मात्र काही केल्या राज कपूर नर्गिस यांच्यापासून लांब जायला तयार नव्हते. मात्र एक दिवशी अचानक राज कपूर यांचे हे स्वप्न तुटले. मदर इंडिया चित्रपटाच्या सेटवर जेव्हा आग लागली त्यावेळी राज कपूर यांच्या सगळी स्वप्न या आगीत जळून खाक झाली. या घटनेनंतर मात्र नर्गिस कायमस्वरुपी सुनील दत्त यांच्या झाल्या.
दिलीप कुमार - मधुबाला
या दोघांची जोडी जेव्हा प्रेक्षकांच्यासमोर यायची तेव्हा जोड्या यावरुनच बनून येतात असेच सगळ्यांना वाटायचे दोघांना एकमेकांसाठी बनवले आहे. दिलीप कुमार यांना लवकरात लवकर मधुबालाला आपले बनवायचे होते. मात्र मुधबाला यांच्या वडिलांना दोघांमधील जवळीकता मान्य नव्हती. त्यामुळे दोघांना वेगळे व्हावे लागले. पुढे जाऊन दिलीप साहेबांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केले आणि मधुबाला यांनी किशोर कुमार यांच्यासोबत संसारात थाटला.
देवानंद - सुरैया
या दोघांची प्रेमकाहानी तर जगजाहीर होती. दोघांचे एकमेंकावर प्रचंड प्रेम होते. जीत चित्रपटाच्या सेटवर देवानंद यांनी सुरैया यांना तीन हजार रुपयांची हिऱ्यांची अंगठी देऊन आपले प्रेम जाहीर केले होते. मात्र सुरैया यांची आजी या प्रेमाच्या विरोधात होती. त्यांना हिंदू-मुस्लिम विवाह मान्य नव्हता. त्यांनी दोघांचे फोनवर बोलणे बंद केले. देवानंद यांना त्यांच्या नातीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला. ऐवढेच नाही तर सुरैया यांना ती हिरांच्या अंगठी समुद्रात फेकून देण्यास सांगितली. पुढे जाऊन देवानंद यांनी आपला संसार थाटला मात्र सुरैया यांनी कधीच लग्न केले नाही.