त्यांनी फोटो काढू दिलाच कसा? ‘या’ फोटोमुळे जया बच्चन झाल्यात ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 01:51 PM2019-06-24T13:51:21+5:302019-06-24T13:51:31+5:30
सध्या अमिताभ यांचा एक फोटो व्हायरल होतोय. अर्थात हा फोटो अमिताभ यांनी शेअर केलला नाही. या फोटोची खास बात काय तर अमिताभ व जया बच्चन यांचा रोमॅन्टिक अंदाज. काहींना या जोडीचा हा रोमॅन्टिक अंदाज भावला. पण अनेकांनी हा फोटो पाहिल्यानंतर जया बच्चन यांना ट्रोल करणे सुरु केले.
मेगास्टार अमिताभ बच्चन स्वत: सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. सध्या अमिताभ यांचा एक फोटो व्हायरल होतोय. अर्थात हा फोटो अमिताभ यांनी शेअर केलला नाही. या फोटोची खास बात काय तर अमिताभ व जया बच्चन यांचा रोमॅन्टिक अंदाज. अमिताभ व जया यात रोमॅन्टिक अंदाजात एकमेकांसोबत बसलेले दिसत आहेत. काहींना या जोडीचा हा रोमॅन्टिक अंदाज भावला. पण अनेकांनी हा फोटो पाहिल्यानंतर जया बच्चन यांना ट्रोल करणे सुरु केले.
अभिषेक नावाच्या एका युजरने तर या फोटोवर वेगळीच प्रतिक्रिया दिली. ‘या महिलेसोबत इतकी वर्षे नाते निभवल्याबद्दल बिग बी यांना एक अवार्ड जरूर मिळायला हवा,’ असे त्याने लिहिले. प्रतिज्ञा नामक एका युजरनेही जया बच्चन यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. ‘अखेर जया बच्चन यांनी फोटो काढण्याची परवानगी दिलीच कशी?’,असे तिने लिहिले. अबीहा कासमी या युजरने तर ‘ही गर्विष्ठ महिला मला अजिबात आवडत नाही,’असे लिहित संताप व्यक्त केला. आणखी एका युजरने ‘अखेर जया बच्चन यांनी फोटो काढला,’ अशी उपरोधिक टीका केली.
जया बच्चन त्यांच्या रागासाठी ओळखल्या जातात. पापाराझींनी फोटोंसाठी पिच्छा पुरवणे तर दूर, एखादा फोटो काढला तरी जया बच्चन यांचा पारा चढतो. आत्तापर्यंत अनेकदा जया बच्चन मीडिया फोटोग्राफ व चाहत्यांवर बरसल्या आहेत. जया बच्चन यांना इतका राग का येतो, हे आत्तापर्यंत अनेकांना पडलेले कोडे होते. पण अलीकडे जया यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले होते.
जया बच्चन claustrophobic या आजाराने पीडित आहे. ही एक प्रकारची मानसिक स्थिती आहे. या आजाराने पीडित व्यक्ती अचानक गर्दी पाहून बेचैन होते. अनेकदा तिला राग येतो. गर्दीच्या ठिकाणी हे लोक अस्वस्थ होतात. श्वेताने सांगितल्या नुसार, गर्दी पाहिली की, जया अस्वस्थ होतात. कुणी धक्का दिलेला वा चुकूनही स्पर्श केलेले त्यांना सहन होत नाही. कॅमे-याचा प्रकाश डोळ्यांवर पडला तरी त्यांना त्रास होतो.