3G, 4G, 5G अन् अमिताभ बच्चन यांचे ट्विट ; पाहिल्यावर तुम्हाला आवरणार नाही हसू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:51 PM2019-09-30T13:51:28+5:302019-09-30T14:35:49+5:30
अमिताभ यांनी केलेले हे ट्विट इतके मजेशीर आहे की, तुम्हाला हसू आवरणार नाही.
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टिव्ह आहेत. ट्विट असो वा फोटो अमिताभ यांची प्रत्येक पोस्ट चाहत्यांचे मनोरंजन करते. नुकतेच त्यांनी एक ट्विट केले आणि बघता बघता त्यांच्या या ट्विटला 60 हजारांवर लाईक्स मिळाले. अमिताभ यांनी केलेले हे ट्विट इतके मजेशीर आहे की, तुम्हालाही हसू आवरणार नाही.
होय, इंटरनेटच्या 3 जी,4 जी,5 जी पॅक्सवर त्यांनी एक जोक शेअर केला आहे. ‘हमारे बचपन में 3 जी,4 जी,5 जी नहीं होते थे. सिर्फ गुरु जी और पिता जी, माता जी होते थे. एक ही थप्पड में नेटवर्क आ जाता था...,’ असा हा जोक आहे. अमिताभ यांनी शेअर केलेला हा जोक लोकांना इतका आवडला की आत्तापर्यंत 6 हजारांवर लोकांनी तो री-ट्विट केला. हजारो लाईक्स त्याला मिळाले.
T 3302 - 🤣🤣🤣🤣🤣 .. this can be justified .. pic.twitter.com/0qezkkM97L
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 28, 2019
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांच्या एका ट्विटमुळे चाहते नाराज झाले होते. इतके की, त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर अनेकांनी निदर्शने केली होती. ‘आरे’मधील मेट्रो कारशेडवरून वाद सुरू असतानाच,अमिताभ यांनी अप्रत्यक्षपण मुंबई मेट्रोला पाठिंबा देणारे ट्विट केले होते.
T 3303 - Camouflaged in dress .. but in exposure to them that come each Sunday .. enlightened and so humbled .. pic.twitter.com/i0RX9LHYUy
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 29, 2019
मेट्रो सेवा अधिक कार्यक्षम आणि सोयीस्कर आहे हे सांगण्यासाठी त्यांनी एका मित्राचे उदाहरणही दिले होते. मेडिकल इमर्जन्सीवेळी मित्राने त्याच्या कारऐवजी मेट्रो सेवेचा पर्याय निवडला. मेट्रो सुविधा सोयीस्कर असल्याचे त्याने परतल्यानंतर सांगितले. खासगी वाहनापेक्षा मेट्रो सुविधा अधिक कार्यक्षम असल्याचे मित्राने सांगितले. अधिकाधिक झाडे लावा, हाच प्रदूषणावर उपाय आहे. मी माझ्या बागेत झाडे लावली आहेत. तुम्ही हे केले का, असे ट्वीट अमिताभ यांनी केले होते.