फोटोत दिसणारी ‘ही’ व्यक्ती अमिताभ बच्चन नाही तर मग आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 05:39 AM2018-03-14T05:39:28+5:302018-03-14T11:09:28+5:30
अमिताभ बच्चन सध्या राजस्थानात जोधपूर येथे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे शूटींग करत आहेत. मंगळवारी याच चित्रपटाच्या सेटवर अमिताभ यांची प्रकृती ...
अ िताभ बच्चन सध्या राजस्थानात जोधपूर येथे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे शूटींग करत आहेत. मंगळवारी याच चित्रपटाच्या सेटवर अमिताभ यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांच्या उपचारासाठी मुंबईतील डॉक्टरांची एक टीम जयपूरला रवाना झाली. तूर्तास अमिताभ यांची प्रकृती ठीक आहे. पण कालपासून त्यांच्याशी संबंधित एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. हा फोटो म्हणजे, अमिताभ यांचे ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधील लूक असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे, फोटोतील चेहराही अमिताभ यांच्याशी मिळता जुळता आहे. प्रथमदर्शनी हा फोटो पाहून तुमच्या डोळ्यांनाही धोका होऊ शकतो. पण हा अमिताभ यांचा फोटो नाहीयं. खुद्द यशराज बॅनरने हा फोटो फेक असल्याचे म्हटले आहे.
आता यशराजने म्हटल्याप्रमाणे हा फोटो अमिताभ यांचा नसेल तर मग आहे तरी कुणाचा? तेच आम्ही तुम्हाला सांगतोय. फोटोतील व्यक्ती एक अफगाणी रिफ्युजी आहे.
होय, स्टीव मॅककरी नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या फोटोशी संबंधित सर्व तपशील उपलब्ध आहे. त्यानुसार, हा फोटो ६८ वर्षांच्या शाहबाजचा आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये १९८१ साली हा फोटो काढला गेला होता. सोशल अकाऊंट स्टीव याचे आॅफिशिअल अकाऊंट नाही. पण हा फोटो स्टीव यांचाच आहे. त्यांच्या आॅफिशिअल वेबसाईटवर हा फोटो आहे. हा फोटो स्टीव यांच्या सर्वोत्तम फोटोपैकी एक आहे.
तूर्तास ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट बराच चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण हा चित्रपट १९३९ साली आलेल्या ‘कन्फेशन्स आॅफ ए ठग’ या कादंबरीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. आमिर खान यात मुख्य भूमिकेत आहे. संबंधित कादंबरीत आमिर अली नावाचा एक ठग असतो आणि तो इंग्रजांच्या नाकीनऊ आणतो. तो एक पठाण आहे. इस्माईल नावाचा एक मोठा ठग त्याला जवळ करतो आणि मुलासारखे वाढवतो. आमिर अली त्याचे मित्र बद्रीनाथ आणि पीर खानसोबत ठगबाजी सुरू करतो. यात गणेशा आणि चीता त्याची मदत करतात. नंतर आमिर अली मोठा जमीनदार बनतो, असे याचे कथानक आहे. कादंबरीतील आमिर अलीचे हेच पात्र आमिर साकारतो आहे.
ALSO READ : शेकडोंच्या गर्दीतून रस्ता काढत ‘जलसा’त शिरली चिमुकली चाहती! बिग बींनी शेअर केलेत फोटो!!