नागराज मंजुळेच्या चित्रपटात अमिताभ बच्चन साकारणार नागपूरच्या ‘या’ व्यक्तीची भूमिका !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2017 11:18 AM2017-08-30T11:18:59+5:302017-08-30T16:48:59+5:30
‘सरकार’ सीरिजमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी इन्स्पायर्ड असलेली भूमिका साकारणारे महानायक अमिताभ बच्चन आता मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ...
‘ रकार’ सीरिजमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी इन्स्पायर्ड असलेली भूमिका साकारणारे महानायक अमिताभ बच्चन आता मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटात बघावयास मिळणार आहेत. चित्रपटात ते विजय बरसे यांची भूमिका साकारणार आहेत. विजय बरसे नागपूरमध्ये एक स्वयंसेवी संस्था चालवितात. ही संस्था गरीब मुलांसाठी फुटबॉल टूर्नामेंटचे आयोजन करीत असते. या भूमिकेसाठी महानायकही उत्सुक असल्याने चाहत्यांना या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
आपल्या या प्रोजेक्टबद्दल बोलताना नागराजने सांगितले की, ‘येत्या आॅक्टोबर महिन्यापासून मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत मी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. हा चित्रपट एक रिअल लाइफ बेस्ड कॅरेक्टरवर आधारित आहे; मात्र चित्रपटातील काही पार्ट वास्तविकतेपेक्षा थोडेसे वेगळे आहेत. त्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. त्याचबरोबर त्याकरिता मला रिसर्चही करावे लागले आहे. पुढे बोलताना नागराजने म्हटले की, ‘मी माझ्या स्क्रिप्टवर खूप वेळ घेतो अन् माझ्या मते त्यात काहीच वावगे नाही. या अगोदर मी ‘सैराट’च्या स्क्रिप्टवर तब्बल आठ वर्षं काम केले आहे.’
यावेळी नागराजने त्याच्या अमिताभ बच्चनसोबतच्या काही आठवणीही सांगितल्या. त्याने म्हटले की, मी अमिताभ बच्चन सरांचा लहानपणापासून फॅन आहे. त्यांच्यासोबत चित्रपट करणे हे माझे स्वप्न होते. हे कॅरेक्टर मी त्यांच्यासाठीच लिहिले आहे. त्यांच्या ड्रेसिंग स्टाइलपासून ते हेअरस्टाइलपर्यंत मी त्यांची कॉपी करीत मोठा झालो आहे. ‘दीवार’ आणि ‘मजबूर’ चित्रपटात त्यांचे काम जबरदस्त आहे. हा चित्रपट बघितल्यानंतर मी त्यांच्याप्रमाणे शर्ट बांधून शाळेत जाऊ इच्छित होतो. मी तसा प्रयत्नही केला. परंतु माझ्या टीचरने माझा शर्ट व्यवस्थित करून दिला. बºयाचदा मला याकरिता शिक्षाही झाली; मात्र अशातही माझ्यावर त्याचा कुठलाच परिणाम झाला नाही.’
खरं तर नागराज स्वत:ला अमिताभ बच्चन यांचे भक्त समजतात. याविषयी नागराज सांगतात की, ‘जेव्हा मी अमिताभ यांना भेटलो तेव्हा मी स्वत:वर कंट्रोल केला. त्यावेळी मी स्वत:ला असे फिल करीत होतो की, आता मी मनसोक्तपणे नाचावे. मी त्यांचा आयुष्यभराचा चाहता आहे. जेव्हा या चित्रपटाची शूटिंग पूर्ण होईल तेव्हा मी अमिताभ सरांना सांगणार आहे की, पहिल्यांदा जेव्हा मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा मी कसे फिल केले होते ? सध्या नागराज त्याच्या या प्रोजेक्टवर प्रचंड लक्ष ठेवून आहे. ‘सैराट’सारखाच यशस्वी चित्रपट बनविण्याचा त्याचा मानस आहे.