‘खूप लवकर आठवण झाली...’; अमिताभ यांनी शेअर केला अयोध्येचा फोटो, झालेत ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 11:12 AM2020-11-15T11:12:33+5:302020-11-15T11:15:25+5:30
अयोध्या नगरीचा फोटो पाहून अनेकांनी केले लक्ष्य
दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी अयोध्या नगरीचे फोटो शेअर करत, चाहत्यांना शुभेच्छा दिल्यात. मात्र त्यांच्या या शुभेच्छांचा स्वीकार करण्याऐवजी नेटक-यांनी त्यांना ट्रोल करणे सुुरू केले. बिग बींगनी शेअर केलेला अयोध्या नगरीचा फोटो पाहून अनेकांनी त्यांना लक्ष्य केले.
अमिताभ यांनी शरयू नदीकाठचे दोन फोटो शेअर केलेत. या पोस्टअनुसार, अयोध्येत 5 लाख 84 हजार 572 दिवे उजळण्याचा गिनीज बुक रेकॉर्ड नोंदवण्यात आला.
T 3720 -Happy divali .. 🙏🙏🙏 pic.twitter.com/omcV7M56R8
— Amitabh Bachchan (@SrBachchan) November 13, 2020
मात्र अमिताभ यांनी ही पोस्ट वाचून नेटक-यांनी लगेच त्यांना ट्रोल करणे सुरु केले. खूप लवकर अयोध्येची आठवण झाली तुम्हाला, असे एका युजरने त्यांच्या या पोस्टवर कमेंट करताना लिहिले. तर अन्य एकाने ‘आजही राम मंदिरावर काहीच बोलणार नाही का?’ असा प्रश्न करत त्यांना डिवचले. एका युजरने दिवाळीचे स्पेलिंग चुकवल्याचे अमिताभ यांच्या लक्षात आणून दिले.
आम्ही रिकामटेकडे आहोत म्हणून...
अलीकडे बिग बींनी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरचा स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. मात्र या फोटोसोबत त्यांनी लोकांना असा काही टोमणा मारला की, सगळेच हैराण झाले होते. ‘एक बात तो तय है, इस दुनिया में लोगों के पास फुरसत बहुत है...,’ असे त्यांनी या फोटोसोबत लिहिले होते.
अमिताभ यांची ही पोस्ट वाचून अनेक युजर्सनी त्यांचा क्लास घेतला होता. आमच्याकडे वेळ आहे, म्हणून तर तुम्हा लोकांचा धंदा चालतो. आज तुम्ही श्रीमंत म्हणून मिरवता, ते आमच्या ‘फुर्सत’चीच देन आहे, अशा शब्दांत एका युजरने अमिताभ यांना सुनावले होते. आम्ही रिकामटेकडे नसतो तर संपूर्ण बॉलिवूड रिकामटेकडे असते, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने यावर दिली होती.
अमिताभ बच्चन यांची ‘कोरोना’ कॉलर ट्यून ऐकून वैतागला सीआरपीएफ जवान, म्हणाला...
म्हणून तर तुमचा धंदा चालतो...! अमिताभ बच्चन यांची पोस्ट वाचून नेटकर्यांची सटकली