'मी लवकरच रॅम्पवर...', सोशल मीडियावर पोस्ट करत बिग बींनी दिली तब्येतीबाबत अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:19 PM2023-03-20T12:19:41+5:302023-03-20T12:20:34+5:30

शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी प्रकृतीबाबत पोस्ट केले आहे.

amitabh bachchan posts on social media gave update about his health says hope coming on ramp soon | 'मी लवकरच रॅम्पवर...', सोशल मीडियावर पोस्ट करत बिग बींनी दिली तब्येतीबाबत अपडेट

'मी लवकरच रॅम्पवर...', सोशल मीडियावर पोस्ट करत बिग बींनी दिली तब्येतीबाबत अपडेट

googlenewsNext

Amitabh Bachchan Health Update : महानायक अमिताभ बच्चन यांचा काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या शूटिंगवेळी अपघात झाला होता. यानंतर सर्वांनाच त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत होती. चाहते त्यांच्या एकेका अपडेटची वाट पाहत आहेत. आज सकाळीच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या स्वास्थ्याबाबतीत माहिती दिली. इन्स्टाग्रावर एक फोटो शेअर करत ते लवकरच परत येतील असं त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं. अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट वाचून चाहत्यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले.

बिग बी अमिताभ बच्चन आज ८० वर्षांचे आहेत. मात्र त्यांचं कामारचं प्रेम आणि जिद्द वाखणण्याजोगी आहे. आजही ते तासनतास काम करतात, शूटमध्ये व्यस्त असतात. सध्या अपघातामुळे ते आराम करत आहेत मात्र तरी त्यांना लवकरात लवकर कामाला सुरुवात करायची आहे. आज सकाळीच त्यांनी रॅम्पवरील त्यांचा एक जुना फोटो पोस्ट केला. यामध्ये बिग बी काळ्या रंगाच्या स्टायलिश कुर्त्यात रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहिले, 'माझ्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनेसाठी आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी बरा होतोय आणि लवकरच रॅम्पवर येईन अशी आशा आहे.'

अमिताभ यांच्या या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत. लवकर बरे व्हा असं म्हणत सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आगामी सिनेमा 'प्रोजेक्ट के' च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन जखमी झाले होते. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.

Web Title: amitabh bachchan posts on social media gave update about his health says hope coming on ramp soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.