चाहत्याच्या हातात विठ्ठलाची मूर्ती पाहिली अन्..., अमिताभ बच्चन यांचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:40 PM2024-12-03T12:40:38+5:302024-12-03T12:40:54+5:30
अमिताभ बच्चन प्रत्येक रविवारी मुंबईतील जलसा बंगल्याबाहेरून चाहत्यांची भेट घेतात.
बॉलिवूड महानायक बिग बी अमिताभ बच्चन गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. आजही अमिताभ बच्चन यांची क्रेझ काही कमी झालेली नाही. चाहते त्यांच्यावर तितकंच प्रेम करतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. बिग बी देखील कधी चाहत्यांना नाराज करत नाहीत. प्रत्येक रविवारी ते मुंबईतील जलसा बंगल्याबाहेरून चाहत्यांची भेट घेतात. गेल्या रविवारीही अमिताभ यांनी चाहत्यांची भेट घेतली. याच दरम्यानचा त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यानं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
बॉलिवूडचे सुपरस्टार असूनही त्यांच्या स्वभावात नम्रपणा असल्याचं दिसून येतं. ते प्रत्येक धर्माचा आणि श्रद्धेचा आदर करतात. याचीच प्रचिती त्यांच्या एका व्हिडीओतून मिळाली आहे. गेल्या रविवारी एका चाहत्यांने अमिताभ यांना देण्यासाठी विठ्ठलाची मूर्ती आणली होती. गर्दीत त्या चाहत्याने बिग बी यांच्यासमोर दोन्ही हाताने मुर्ती उचांवली. यावेळी मुर्ती पाहताच अमिताभ यांंनी हात जोडले आणि विठ्ठलाचे आशीर्वाद घेतले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती 16' होस्ट करत आहेत. ते अलिकडेच 'वेट्टियन' या चित्रपटात झळकले. या चित्रपटात बिग बींसोबत रजनीकांतही महत्त्वाच्या भूमिकेत होते. तर त्याआीधी अमिताॉभ हे 'कल्की 2898 एडी' चित्रपटात आपल्या दमदार भूमिकेत पाहायला मिळाले. अमिताभ हे जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. 1969 मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आजपर्यंत आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीत त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले आहेत.