'पैसे भरले, हातही जोडले, आता काय...' Blue Tick काढल्याने बिग बी Twitter वर वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 02:38 PM2023-04-21T14:38:19+5:302023-04-21T14:40:07+5:30

अमिताभ बच्चन यांची ट्विटरकडे विनंती

amitabh bachchan requests twitter to give back blue tick says now have made payment also | 'पैसे भरले, हातही जोडले, आता काय...' Blue Tick काढल्याने बिग बी Twitter वर वैतागले

'पैसे भरले, हातही जोडले, आता काय...' Blue Tick काढल्याने बिग बी Twitter वर वैतागले

googlenewsNext

मायक्रोब्लॉगिगं साईट ट्विटरने अनेक सेलिब्रिटींचे ब्लू टिक हटवले आहेत. ज्यांनी महिन्याचे पैसे भरलेले नाहीत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विराट रोहली या दिग्गजांचा समावेश आहे. ब्लू टिक हटवल्यानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मात्र चलबिचल झालेत. त्यांनी त्वरित पैसे भरले पण अद्याप ब्लू टिक मिळालं नसल्याने त्यांनी ट्विटरकडे हात जोडून विनंती केली आहे.

महानायक अमिताभ बच्चन ट्विटरवर सतत अॅक्टिव्ह असतात. ब्लू टिक ही तर सेलिब्रिटींची खरी ओळख असते. मात्र आता तेच गायब केल्याने बिग बी वैतागले आहेत. त्यांनी थेट ट्विटरसमोर हात जोडलेत. ट्विटरला विनंती करत त्यांनी ट्वीट करत लिहिले,'ए ट्विटर भय्या, ऐकतोय का? आता तर पैसेही भरले...मग ती जी आमच्या नावासमोर निळी टीक असते ना ती परत लाव भैय्या..यामुळे लोकांना कळेल की तो मीच आहे..अमिताभ बच्चन..हात तर जोडलेच आहेत, आता काय पाया पडू का??'

अमिताभ बच्चन यांनी भोजपुरी भाषेत हे ट्वीट केले आहे जे आता व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रियाही येत आहेत. एकाने लिहिले,'सब्र का फल ब्लू टिक होता है' तर दुसरा म्हणतो, 'काय बोलायचं बच्चन साहेब, या एलॉन मस्कचं काय करायचं.'

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा कारभार सांभाळायला घेतल्यानंतर सतत काही ना काही बदल होत आहेत. याआधी ब्लू टिक फुकट होती. मात्र आता ब्लू टिक हवी असल्यास पैसे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.  भारतात सबस्क्रिप्शनचे दरमहा 650 रुपये चार्ज आहे. तर मोबाईल युझर्ससाठी 900 रुपये प्रतिमहा चार्ज आहे.

Web Title: amitabh bachchan requests twitter to give back blue tick says now have made payment also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.