अमिताभ बच्चन यांनी ‘पॅडमॅन’मधील भूमिकेचा केला खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2017 02:55 PM2017-04-16T14:55:04+5:302017-04-16T20:25:04+5:30
एक दिवसापूर्वीच बातम्या समोर आल्या होत्या की, महानायक अमिताभ बच्चन आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटात कॅमियो करताना बघावयास मिळणार आहेत. ...
ए दिवसापूर्वीच बातम्या समोर आल्या होत्या की, महानायक अमिताभ बच्चन आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटात कॅमियो करताना बघावयास मिळणार आहेत. आर. बाल्की यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या चित्रपटात अक्षयकुमार प्रमुख भूमिकेत आहे, तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत राधिका आपटे दिसणार आहे. सोनम कपूर हिचीही महत्त्वपूर्ण भूमिका यात असून, अमिताभ यांनी त्यांच्या भूमिकेविषयीचे अनेक रहस्य उलगडले आहेत.
‘पॅडमॅन’ या चित्रपटात अमिताभ त्यांच्या अंदाजात बघावयास मिळणार आहेत. अमिताभ यांनी काल म्हणजेच शनिवारी दिल्ली येथे चित्रपटाची शूटिंगही केली. आयआयटी येथे झालेल्या या शूटिंगमध्ये अमिताभचा जलवा बघण्यासारखा होता. शूटिंग आटोपल्यानंतर अमिताभ यांनी रात्री त्यांच्या ब्लॉगवर लिहिले की, ‘आर. बाल्की यांनी आयआयटी दिल्ली येथे अक्षयकुमार आणि सोनम कपूर यांच्यासोबत एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. आयआयटी हे जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित संस्थांनापैकी एक आहे; त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, काही शॉट्समध्ये मी माझ्या अंदाजात दिसायला हवा.
दरम्यान समोर आलेल्या शूटिंगच्या काही फोटोंवरून हे स्पष्ट होत आहे की, चित्रपटात अमिताभचा अंदाज हा खरोखरच त्यांच्या शैलीतील आहे. ‘पॅडमॅन’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित आहे. अरुणाचलम यांनी सॅनेटरी नॅपकिन बनविण्याचा सगळ्यात सोपा उपाय शोधून काढला होता. या चित्रपट पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार आहे. मात्र आतापासूनच हा चित्रपट चर्चेत असल्याने पडद्यावर काय कमाल करणार याबाबतची उत्सुकता आहे.