Amitabh Bachchan : 'त्या' सीनला प्रचंड घाबरले होते 'बिग बी'; १५ तास स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 02:06 PM2022-10-20T14:06:40+5:302022-10-20T14:06:57+5:30

Amitabh Bachchan : होय, हा एक सीन शूट करताना अमिताभ बच्चन इतके घाबरले होते की, ते मेकअप रूममध्ये 15 तास दडून बसले होते...

Amitabh Bachchan Reveals He Was Scared To Do Temple Scene In Deewar | Amitabh Bachchan : 'त्या' सीनला प्रचंड घाबरले होते 'बिग बी'; १५ तास स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं!

Amitabh Bachchan : 'त्या' सीनला प्रचंड घाबरले होते 'बिग बी'; १५ तास स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं!

googlenewsNext

‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता...’, ‘आज खुश तो बहुत होगे तुम...’ है डायलॉग आठवले की पाठोपाठ आठवतो तो अमिताभ बच्चनचा (Amitabh Bachchan ) ‘दीवार’ (Deewar  ) हा सिनेमा. 1975 साली रिलीज झालेल्या या सिनेमाने  बच्चनच्या स्टारडमला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. या चित्रपटाशी अमिताभ बच्चन यांच्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. पण एक आठवण अशी आहे की जिच्याबद्दल ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. होय, खुद्द बिग बींनी ‘कौन बनेगा करोडपती 14’मध्ये ही आठवण शेअर केली. ‘दीवार’मधला एक सीन शूट करताना अमिताभ बच्चन इतके घाबरले होते की, ते मेकअप रूममध्ये 15 तास दडून बसले होते.

‘दीवार’ या चित्रपटात अमिताभ यांनी विजय वर्मा नावाच्या एका नास्तिक माणसाची व्यक्तिरेखा साकारली होती. विजय वर्माचा देवावर  विश्वास नसतो. पण आईच्या प्राणांची भीक मागण्यासाठी तो प्रथमच मंदिराच्या पायऱ्या चढतो. चित्रपटाच्या शेवटी जेव्हा आई आजारी पडते, तेव्हा वाईट मार्गाला गेलेला विजय प्रार्थना करण्यासाठी त्याच मंदिरात जातो, जिथे जायला तो कधीही तयार नसायचा. याच मंदिरात देवापुढे अमिताभच्या तोंडून ‘आज खुश तो बहुत होगे तुम...,’ हा डायलॉग ऐकायला मिळतो. हा सीन, या सीनमधील डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला. पण हाच सीन शूट करताना अमिताभ प्रचंड घाबरले होते.

या सीनबद्दल अमिताभ बोलले. ते म्हणाले, ‘आम्ही सकाळी 7 वाजता शूटींग सुरू केली होती आणि मी मात्र माझ्या रूममध्ये बसून होतो. रात्रीचे 10 वाजले तरी मी रूममध्ये होतो. मी हा सीन कसा करणार? हाच प्रश्न मला छळत होता. एका नास्तिक माणसाला आईचे प्राण वाचवण्यासाठी देवासमोर प्रार्थना करायची असते. मी हे कसं करणार? मी काय बोलणार? मी कसा अभिनय करणार? हेच डोक्यात सुरू होतं. मी सकाळपासून मेकअप करून आपल्या लुकसोबत तयार होतो. यश चोप्रा सेटवर आलेत आणि चलो भाई, शॉट रेडी है, असं म्हणाले. पण खरं सांगतो... मला माझ्या मेकअप रूमबाहेर येण्याचा धीरच होत नव्हता. तो सीन माझ्यासाठी सर्वात कठीण सीन होता. पण मी त्या लेखकाला सलाम करतो, ज्याने ती पहिली ओळ लिहिली... खुश तो बहुत होगे तुम..., काय लाईन होती...,’

असं म्हणतात की, हा एक सीन शूट करताना सेटवर कोणीही उपस्थित नसावं,अशी विनंती अमिताभ यांनी यश चोप्रा यांना केली होती. रात्री 10 नंतर हा सीन शूट केला गेला आणि 15 टेकनंतर यश चोप्रांनी हा शॉट ओके केला.
‘दीवार’ हा सिनेमा यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटात शशी कपूर यांनी अमिताभ यांच्या भावाची भूमिका साकारली होती तर अभिनेत्री निरूपा रॉय यांनी दोघांच्या आईची भूमिका साकारली होती.  

Web Title: Amitabh Bachchan Reveals He Was Scared To Do Temple Scene In Deewar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.