​अमिताभ बच्चन अक्षय कुमारला म्हणाले, अक्षय तू असे करायला नको होते! पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 08:54 AM2017-11-29T08:54:04+5:302017-11-29T14:24:04+5:30

गोव्यात रंगलेल्या ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) समारोपिय कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी आॅफ ...

Amitabh Bachchan said to Akshay Kumar, Akshay, you did not want to do this! But why? | ​अमिताभ बच्चन अक्षय कुमारला म्हणाले, अक्षय तू असे करायला नको होते! पण का?

​अमिताभ बच्चन अक्षय कुमारला म्हणाले, अक्षय तू असे करायला नको होते! पण का?

googlenewsNext
व्यात रंगलेल्या ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) समारोपिय कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांना ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी आॅफ द ईअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईरानी यांच्या हस्ते अमिताभ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारासाठी अमिताभ यांना मंचावर निमंत्रित केले गेले आणि अक्षय कुमार लगेच अमिताभ यांना घ्यायला पोहोचला. अमिताभ यांना बघताच, अक्षय त्यांच्या पाया पडण्याासाठी खाली झुकला. पण त्यापूर्वीच अमिताभ यांनी अक्षयला वर उचलत त्याला अलिंगन दिले.





अमिताभ आणि अक्षयचा  इफ्फीतील हा फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहे. अक्षय कुमारने बिग बींचे चरणस्पर्श केल्याचे पाहून twitter युजर्सनी याची प्रशंसा केली. पण यामुळे अमिताभ कमालीचे अवघडले. एका युजरने शेअर केलेला या प्रसंगाचा फोटो रि-tweet करत , ‘अक्षयच्या कृतीने मी संकोचलो. अक्षय, असे करायला नको होते’, असे बिग बींनी लिहिले. यानंतर बिग बींनी इफ्फी समारोहातील अन्य काही फोटो शेअर करत, अक्षय कुमार, करण जोहर आदींचे आभार मानलेत. 


या सोहळ्यात अक्षयने अमिताभ यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. अमिताभ बच्चन यांच्यावर एक सुपर कॉमिक बुक निघाली आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. मी ते पुस्तक वाचलेयं. ‘जहां हम खडे हो जाते है, वहीं से लाईन शुरू होती है,’ हे त्यातील संवाद मला आजही आठवतात. माझ्या मते, अमेरिकेत सुपरमॅन आहे, बॅटमॅन आहे, स्पाईडर मॅन आहे आणि आपल्याकडे अँग्री मॅन आहे, असे अक्षय म्हणाला.

ALSO READ : आराध्याच्या बर्थ डे पार्टीत अमिताभ यांच्याकडे हट्ट धरून बसला शाहरूखचा अबराम खान!

आपल्या भाषणात अमिताभ यांनी जात, वर्ण, वंश, धर्म यापलीकडे एकत्र येत सिनेमाची ताकद वाढविण्याचे आवाहन केले. चित्रपटगृहांत चित्रपट बघत असताना आपण आपल्या बाजूच्या माणसाचा जात, धर्म, वंश विचारत नाही. चित्रपटातील प्रत्येक भावनेशी सगळेच समान भावनेने एकरूप होतात. आजच्या काळात अशी एकरूपता केवळ सिनेमाच्या जगातच पाहायला मिळते, असे अमिताभ यावेळी म्हणाले.


Web Title: Amitabh Bachchan said to Akshay Kumar, Akshay, you did not want to do this! But why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.